(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kalyan - Dombivali : राज्यातील शासकीय आणि आपत्ती व्यवस्थापन कितपत सज्ज? डोंबिवलीत केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाच्या निर्देशांनंतर मॉक ड्रिल
Kalyan - Dombivali : केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाने राज्यातील स्थानिक शासकीय आणि आपत्ती व्यवस्थापन किती सज्ज, याबाबत मॉक ड्रिल घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कल्याण - डोंबिवली : नोकरी करण्यासाठी केंद्र शासनाच्या (Central Government) गृह मंत्रालयाने (Home Ministry) राज्यभर स्थानिक यंत्रणांना मॉक ड्रिल (Mock Drill) करण्याचे निर्देश देण्यात आलेत. त्याच पार्श्वभूमीवर कल्याण तालुक्यातील डोंबिवलीमध्ये (Dombivali) मॉक ड्रिल घेण्यात आलं. स्थानिक शासकीय आणि आपत्ती व्यवस्थापन किती सज्ज आहे, याकरिता हे मॉक ड्रिल घेण्यात आले. कल्याण तालुका प्रांत अधिकारी विश्वास गुजर, तहसिलदार जयराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हे मॉक ड्रिल करण्यात आले.
डोंबिवली एमआयडीसी (MIDC) येथील घारडा केमिकल या कंपनीत विषारी वायूची गळती झाली असल्याचं चित्र उभारण्यात आली. त्याच पार्श्वभूमीवर या कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांचं मॉक ड्रिल करण्यात आले. यामध्ये गळती रोखण्यासाठी महापालिका अग्निशमन दल आणि अग्निशमन दल यांच्याकडून प्रयत्न करण्यात आले. त्याचवेळी ही वायुगळती देखील आटोक्यात आणली गेली. कंपनीतील गॅसगळती मुळे बाधित कर्मचारी आणि कंपनी बाहेरील बाधित नागरिकांवर प्रथोमचार देखील केले गेले. त्यांच्यावर महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत उपचार करण्यात आले.
या मॉक ड्रिलवेळी महसूल विभागाचे पथक, तसेच नागरी संरक्षण दल, एनडीआरएफचे पथक, महापालिका अग्निशमन दल, आरोग्य विभाग, स्वच्छता विभाग, विद्युत विभाग, पाणी पुरवठा विभाग, परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. दरम्यान या मॉक ड्रिलवेळी संबंधित कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देखील देण्यात आले.
राज्यात सध्या सरकारी नोकरीसाठी कोणते विभाग किती सज्ज आहे, याची पडताळणी गृह विभागाकडून करण्यात येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर कल्याण - डोंबिवलीमध्ये हे मॉक ड्रिल घेण्यात आले. अनेक सरकारी विभागांमध्ये आपत्तीच्यावेळी योग्य पावलं उचलण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. तेच प्रशिक्षण कल्याण डोंबिवलीमध्ये देण्यात आलं. यावेळी थेट वायू गळतीचा प्रयोग करण्यात आला. यामुळे आपत्ती व्यवस्थापन विभाग किती सज्ज आहे, हे देखील दृष्टीक्षेपात आलं. तसेच गृह मंत्रालयाचे हे निर्देश असल्यामुळे हे मॉक ड्रिल घेणं गरजेचं होतं. यावेळी अनेक आयुक्त आणि अधिकारी देखील उपस्थित होते.