एक्स्प्लोर

Buddhist Conference Thane : जगाला युद्ध नको, बुद्ध हवा, कर्मकांडाच्या जाळ्यात न फसता बुद्धांचे विचार आचरणात आणा : एकनाथ शिंदे

Eknath Shine Thane Speech : सम्राट अशोक जयंतीनिमित्त ठाण्यात आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद पार पडली असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुद्धांच्या विचारांचा जागतिक शांततेसाठी महत्त्व अधोरेखित केला.

ठाणे : या जगाला युद्धाची नव्हे तर बुद्धाची गरज आहे, सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत बुद्धांच्या तत्वज्ञानाची गरज असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अधोरेखित केलं. कर्मकांडाच्या जाळ्यात न फसता बुद्धांचे विचार आचरणात आणण्याचं आवाहनही एकनाथ शिंदे यांनी केलं. ठाण्यातील आठव्या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेमध्ये ते बोलत होते.

सम्राट अशोक जयंतीचं औचित्य साधून ठाण्यात आठव्या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलं. बुद्धरत्न सागर वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने गडकरी रंगायतन येथे हा कार्यक्रम पार पडला. या परिषदेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार ज्योती वाघमारे (Jyoti Waghmare) आणि महापौर शर्मिला पिंपळोकर (Sharmila Pimpalolkar) उपस्थित होते. जगभरातून बौद्ध धम्माचा प्रसार करणारे भन्ते या परिषदेसाठी ठाण्यात दाखल झाले होते.

Honor Ceremony : 'बौद्ध रत्न’ देऊन शिंदेंचे सन्मान

या परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भिक्खू संघाकडून ‘बौद्ध रत्न’ देऊन गौरवण्यात आलं. त्यांच्या कामाचा गौरव करत सन्मानचिन्ह देण्यात आलं. तसंच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाची प्रतही त्यांना देण्यात आली. यावेळी भिक्खू समाजाकडून एकनाथ शिंदेंना आशीर्वाद देण्यात आला. भविष्यात पुन्हा मुख्यमंत्री व्हावं, अशा शुभेच्छाही देण्यात आल्या. तसंच त्यांना बौद्ध प्रतिमाही भेट देण्यात आली.

Eknath Shinde Speech : जगाला बुद्धाची गरज

एकनाथ शिंदे म्हणाले की, धर्मवीर आनंद दिघे यांच्या ठाण्यातील लोकांनी एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला मुख्यमंत्री केलं. भिक्खूंच्या उपस्थितीमुळे ठाण्याची भूमी पावन झाली. जगात शांतता हवी असेल तर बुद्धांचे विचार आवश्यक आहेत. जगाला युद्ध नको, बुद्ध हवा. सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत बुद्धांच्या तत्वज्ञानाची गरज आहे. बुद्धांना केवळ मूर्तीत नाही तर विचारात शोधा आणि कर्मकांडात अडकू नका. 

संघदान ही केवळ कृती नसून बुद्धांप्रती समर्पणाची भावना असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले, 'ना तलवार की धार से, ना गोली की बौछार से… दुनिया बदलेगी बुद्ध के विचार से' असं एकनाथ शिंदे म्हणाले.

Eknath Shinde On Dr. Babasaheb Ambedkar : बाबासाहेबांबाबत वक्तव्य

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच माझ्यासारखा कार्यकर्ता मुख्यमंत्री झाला, असं सांगत त्यांनी त्यांना अभिवादन केलं. महाराष्ट्राच्या इतिहासात ‘वर्षा’ निवासस्थानी पहिल्यांदाच धम्म वचन म्हटलं गेलं, याचाही त्यांनी उल्लेख केला.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
उद्धव ठाकरे म्हणजे बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना, शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्केंचा हल्लाबोल, म्हणाले, त्यांचा न्यायालयावर अविश्वास 
उद्धव ठाकरे म्हणजे बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना, शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्केंचा हल्लाबोल, म्हणाले, त्यांचा न्यायालयावर अविश्वास 
Ramesh Mhatre: डॉक्टरांना मारहाण प्रकरण! नगरसेवक रमेश म्हात्रेला अखेर उच्च न्यायालयाचा दिलासा; कठोर अटी अन् शर्तीसह चारही आरोपींना जामीन मंजूर, कोर्टात नेमकं काय घडलं?
डॉक्टरांना मारहाण प्रकरण! नगरसेवक रमेश म्हात्रेला अखेर उच्च न्यायालयाचा दिलासा; कठोर अटी अन् शर्तीसह चारही आरोपींना जामीन मंजूर, कोर्टात नेमकं काय घडलं?
Mumbai Railway: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 16 वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला पुन्हा मुदतवाढ; मेल-एक्सप्रेस गाड्यांवर होणार परिणाम
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 16 वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला पुन्हा मुदतवाढ; मेल-एक्सप्रेस गाड्यांवर होणार परिणाम

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SL : 6,6,6,6 गुरनूर ब्रारने दणादण षटकार ठोकले, बसलेले सगळे उठले; गंभीर जे केले, ते सर्व बघत बसले, शेवटच्या षटकातील थरार, VIDEO
6,6,6,6 गुरनूर ब्रारने दणादण षटकार ठोकले, बसलेले सगळे उठले; गंभीर जे केले, ते सर्व बघत बसले, शेवटच्या षटकातील थरार, VIDEO
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
Tukaram Mundhe Marathi News: बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
Nashik Earthquake Marathi News: नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
Embed widget