एक्स्प्लोर

Nashik Kumbh 2026 : 35 हजार कोटींची कामं, कुंभमेळा भव्य करणार, देवेंद्र फडणवीसांचा संत संमेलनात मोठा शब्द

Nashik Kumbh Mela : गोदावरी नदी स्वच्छ ठेवण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येणार असून त्र्यंबकेश्वर येथे वर्षभर पाणी वाहत राहील यासाठीही काम सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

नाशिक : अखिल भारतीय संत संमेलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सिंहस्थ कुंभमेळ्याबाबत मोठी घोषणा केली आहे. यंदाचा कुंभ भव्य-दिव्य करणार असं सांगत मुख्यमंत्र्यांनी 35 हजार कोटी रुपयांच्या कामांचा रोडमॅप मांडला. प्रभू श्रीराम आणि त्र्यंबकेश्वर नगरीत सर्व संत-महंतांचं स्वागत करत त्यांनी सनातन संस्कृतीच्या जतनावर भर दिला.

Nashik Kumbh Mela Preparation : कुंभमेळ्याची तयारी

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मागील कुंभपेक्षा अधिक भाविक आले तरी सर्व सुविधा तयार ठेवणार आहोत. नाशिकमध्ये जागेची मर्यादा असली तरी जास्तीत जास्त जागा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "सनातन संस्कृतीने सर्व टिकून ठेवले. कित्येक आक्रमणांच्या नंतर ती आजही टिकून आहे. आपली महाराष्ट्राची वारकरी संप्रदाय परंपरा आहे. औरंगजेबाने किती अडचणी आणल्या तरी आपली वारी परंपरा सुरू आहे. संतांच्या विचारांनी फक्त स्नान नाही तर आपलं मन देखील शुद्ध होते. यासाठी कुंभमेळा महत्त्वाचा पर्व आहे. सर्व संत महंत यांनी आम्हाला आपलेसे केले आहे. त्यामुळे यंदाचा कुंभ भव्य -दिव्य करण्याचा आमचा प्रयत्न आहे."

Nashik Kumbh Mela Infrastructure Plan : पायाभूत सुविधा

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी रस्ते, रेल्वे आणि विमानतळ सुविधा वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. गोदावरी नदी स्वच्छ ठेवण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येणार असून त्र्यंबकेश्वर येथे वर्षभर पाणी वाहत राहील यासाठीही काम सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

Sadhugram Decision : साधुग्रामसाठी मोठा निर्णय

आतापर्यंत साधुग्रामसाठी शेतकऱ्यांकडून भाडे तत्वावर जमीन घेतली जात होती. मात्र आता ती जमीन थेट खरेदी करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचं त्यांनी जाहीर केलं. 

On Sanatan & Saints : सनातन आणि संतांवर भाष्य

सनातन संस्कृती ही कधीही नष्ट न होणारी असून अनेक आक्रमणांनंतरही ती टिकून असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. वारकरी परंपरेचा उल्लेख करत संतांच्या विचारांमुळे मन शुद्ध होतं, त्यामुळे कुंभमेळा महत्त्वाचा असल्याचं त्यांनी म्हटलं.

Strict Action : गैरप्रकारांवर कारवाई

संत महंतांचा गैरवापर करून ज्यांनी संत संप्रदायाला, सनातनाला कलंकीत करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर कारवाई करू असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. राज्यात गोवंश हत्या कायदा लागू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तसंच लव्ह जिहाद संदर्भातही धोरणात्मक निर्णय घेण्याचा इशारा देत मातेच्या धर्मानुसार संततीचा धर्म ठरवण्याबाबत भूमिका मांडली.

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

Chhagan Bhujbal and Girish Mahajan: नाशिकच्या खड्ड्यांवरून महायुतीतील दोन मंत्र्यांमध्ये जुंपली; गिरीश महाजनांशी अबोला? छगन भुजबळांनी सगळंच सांगितलं, म्हणाले...
नाशिकच्या खड्ड्यांवरून महायुतीतील दोन मंत्र्यांमध्ये जुंपली; गिरीश महाजनांशी अबोला? छगन भुजबळांनी सगळंच सांगितलं, म्हणाले...
Real estate house possession RERA: नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश
नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश
Nashik Heavy Rain : नाशकात पावसाचा हाहाकार! धारणांसह नदीपातळीत मोठी वाढ, हवामान विभागाकडून आज अतिवृष्टीचा इशारा, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
नाशकात पावसाचा हाहाकार! धारणांसह नदीपातळीत मोठी वाढ, हवामान विभागाकडून आज अतिवृष्टीचा इशारा, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
Maharashtra Rain: पावसाचा रौद्रावतार! विदर्भ मराठवाड्यासह निम्म्या महाराष्ट्राला अलर्ट, नाशिक, नंदुरबार जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, IMDचा राज्यासाठी महत्वाचा इशारा
पावसाचा रौद्रावतार! विदर्भ मराठवाड्यासह निम्म्या महाराष्ट्राला अलर्ट जारी, नाशिक, नंदुरबार जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, हवामान विभागाचा राज्यासाठी महत्वाचा इशारा

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget