एक्स्प्लोर

मोठी बातमी : महेश गायकवाड रुग्णालयातून बाहेर, पत्नीची मोठी प्रतिक्रिया, गणपत गायकवाडांबद्दल म्हणाल्या...

Ganpat Gaikwad Firing Case : भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केल्यानंतर शिवसेनेच्या गणपत गायकवाड यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. 

मुंबई: शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांच्या पत्नी सारिका गायकवाड यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. असं नव्हतं व्हायला पाहिजे होतं. त्यांनी केलं ते खूप चुकीचं केलं. आता त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, जेणेकरून पुन्हा कुणासोबत असं घडू नये असं त्या म्हणाल्या. 

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार (Ganpat Gaikwad Firing) केला होता. त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या महेश गायकवाड यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. आता त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

काय म्हणाल्या सारिका गायकवाड? 

महेश गायकवाड यांच्या पत्नी सारिका गायकवाड म्हणाल्या की, महेश गायकवाडांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर चांगलं वाटतंय. पण गणपत गायकवाड यांनी जे काही केलं ते चुकीचं केलं. त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, जेणेकरून इतर कुणासोबत अशी घटना घडणार नाही. 

महेश गायकवाडांच्या स्वागतासाठी शहरभर बॅनर

महेश गायकवाड यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी कल्याणमध्ये जागोजागी बॅनर लावण्यात आले आहेत. तसेच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. 

उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यात गणपत गायकवाड यांनी शुक्रवार 2 फेब्रुवारी रोजी महेश गायकवाड आणि सहकारी राहुल पाटील (Rahul Patil) यांच्यावर जमिनीच्या वादावरून एकूण 10 गोळ्या झाडल्या होत्या. त्यापैकी महेश गायकवाड यांच्यावर सहा गोळ्या तर राहुल पाटील यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या होत्या. त्यामुळे दोघांना तातडीने उपचारासाठी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात (Jupiter Hospital) हलविण्यात आले होते. 

गणपत गायकवाड यांच्यासह 5 जणांना न्यायालयीन कोठडी

या गोळीबार प्रकरणात गणपत गायकवाड यांच्यासह 5 जणांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी उल्हासनगर चोपडा कोर्टाकडून देण्यात आलेली आहे. सध्या सर्व आरोपीना सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तळोजा कारागृहात हलविण्यात आलं आहे. या प्रकरणामुळे येणाऱ्या काळात कल्याण - डोंबिवली मतदार संघात शिवसेना आणि भाजप असा आमना सामना पाहायला मिळणार आहे. महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह इतर नेते मंडळी यांनी देखील उपचारादरम्यान भेटून गेले होते.

दरम्यान, आज संध्याकाळी सहा वाजता महेश गायकवाड यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेचे (Press Conference) आयोजन करण्यात आले आहे. महेश गायकवाड हे आज काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hiray Family : निमगावच्या 'हिरे' घराण्याची चर्चा तर होणारच; दहा हजार लोकवस्तीच्या गावाने दिले आठ आमदार
निमगावच्या 'हिरे' घराण्याची चर्चा तर होणारच; दहा हजार लोकवस्तीच्या गावाने दिले आठ आमदार
Maha Vikas Aghadi Manifesto : लाडक्या बहिणींपेक्षा सुशिक्षित बेरोजगारांना सर्वाधिक मानधन; जन्माला येणाऱ्या लेकींसाठी मविआची मोठी घोषणा
लाडक्या बहिणींपेक्षा सुशिक्षित बेरोजगारांना सर्वाधिक मानधन; जन्माला येणाऱ्या लेकींसाठी मविआची मोठी घोषणा
Girish Mahajan : अडीच वर्ष झोपले...? सिंचन घोटाळ्याच्या 'त्या' आरोपावरून गिरीश महाजनांनी जयंत पाटलांना डिवचलं
अडीच वर्ष झोपले...? सिंचन घोटाळ्याच्या 'त्या' आरोपावरून गिरीश महाजनांनी जयंत पाटलांना डिवचलं
US Election 2024 : डोनाल्ड्र ट्रम्प यांची अमेरिकेत एकहाती सत्ता, तब्बल 312 जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व; सात महत्वाच्या राज्यांमध्येही दणदणीत विजय
डोनाल्ड्र ट्रम्प यांची अमेरिकेत एकहाती सत्ता, तब्बल 312 जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व; सात महत्वाच्या राज्यांमध्येही दणदणीत विजय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sneha Sonkate Dharashiv : प्रचार साहित्यात आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याप्रकरणी स्नेहा सोनकाटेंना नोटीसDevendra Fadnavis Speech Manifesto: शेतमालाला योग्य भाव देण्यासाठी 'भावांतर' योजना; फडणवीसांची घोषणाNana Patole Bhandara : नाना पटोलेंची लाडकी लेक निवडणूक प्रचारातPraniti Shinde Kolhapur : लाव रे तो व्हिडिओ म्हणत प्रणिती शिंदेंचा महाडिकांवर घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hiray Family : निमगावच्या 'हिरे' घराण्याची चर्चा तर होणारच; दहा हजार लोकवस्तीच्या गावाने दिले आठ आमदार
निमगावच्या 'हिरे' घराण्याची चर्चा तर होणारच; दहा हजार लोकवस्तीच्या गावाने दिले आठ आमदार
Maha Vikas Aghadi Manifesto : लाडक्या बहिणींपेक्षा सुशिक्षित बेरोजगारांना सर्वाधिक मानधन; जन्माला येणाऱ्या लेकींसाठी मविआची मोठी घोषणा
लाडक्या बहिणींपेक्षा सुशिक्षित बेरोजगारांना सर्वाधिक मानधन; जन्माला येणाऱ्या लेकींसाठी मविआची मोठी घोषणा
Girish Mahajan : अडीच वर्ष झोपले...? सिंचन घोटाळ्याच्या 'त्या' आरोपावरून गिरीश महाजनांनी जयंत पाटलांना डिवचलं
अडीच वर्ष झोपले...? सिंचन घोटाळ्याच्या 'त्या' आरोपावरून गिरीश महाजनांनी जयंत पाटलांना डिवचलं
US Election 2024 : डोनाल्ड्र ट्रम्प यांची अमेरिकेत एकहाती सत्ता, तब्बल 312 जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व; सात महत्वाच्या राज्यांमध्येही दणदणीत विजय
डोनाल्ड्र ट्रम्प यांची अमेरिकेत एकहाती सत्ता, तब्बल 312 जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व; सात महत्वाच्या राज्यांमध्येही दणदणीत विजय
Amit Shah: भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध होताच अमित शाह उद्धव ठाकरेंवर कडाडले; शरद पवारांनाही प्रश्न विचारले!
भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध होताच अमित शाह उद्धव ठाकरेंवर कडाडले; शरद पवारांनाही प्रश्न विचारले!
BJP Manifesto : भाजपच्या संकल्पपत्रात घोषणांचा पाऊस; जाहीरनाम्याची A to Z माहिती, एका क्लिकवर
BJP Manifesto : भाजपच्या संकल्पपत्रात घोषणांचा पाऊस; जाहीरनाम्याची A to Z माहिती, एका क्लिकवर
बॉयफ्रेंडसोबत मिळून मित्राचे 300 तुकडे, हत्या करुन शॉपिंगला गेली प्रसिद्ध अभिनेत्री, नेमकं प्रकरण काय?
बॉयफ्रेंडसोबत मिळून मित्राचे 300 तुकडे, हत्या करुन शॉपिंगला गेली प्रसिद्ध अभिनेत्री, हिला ओळखलंत का?
Amit Shah on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे सोबत येणार का? केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांकडून दोन वाक्यात उत्तर!
उद्धव ठाकरे सोबत येणार का? केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांकडून दोन वाक्यात उत्तर!
Embed widget