धर्मवीर आनंद दिघेंच्या बहिणीला पॅरालिसिसचा अटॅक; एकनाथ शिंदेंनी चक्रं फिरवली, तातडीने बड्या रुग्णालयात व्यवस्था
Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या भगिनी अरुणाताई गडकरी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) साहेब यांच्या ज्येष्ठ भगिनी अरुणाताई गडकरी (Arunatai Gadkari) यांची काल ठाण्यातील कौशल्य हॉस्पिटल येथे जाऊन भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून अरुणाताई गडकरी यांची तब्येत बरी नसल्याने त्यांना कौशल्य हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली तसेच त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर संजय ओक यांच्याकडून त्यांच्या तब्येतीची माहिती यावेळी घेतली. याप्रसंगी त्यांच्यावर सुरू असलेल्या औषधोपचाराबद्दल जाणून घेतले. यावेळी अरुणाताईंवर शक्य ते सारे उपचार करावेत आणि त्या पूर्ण बऱ्या होतील यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती एकनाथ शिंदे यांनी डॉक्टरांना केली. अरुणाताई गडकरी यांच्यावर आता ज्युपिटर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
एकनाथ शिंदे काय म्हणाले?
अरुणाताई गडकरी यांना पॅरालिटीक अटॅक आलेला आहे. आता त्यांना पाहायला आलो होतो. डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर त्यांना ज्युपिटरला हलवण्याचा निर्णय घेतला आहे. अरुणाताई गडकरी यांची प्रकृती स्थिर असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. पुढचे जे काही उपचार आहेत ते ज्युपिटरमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. आता अरुणाताई गडकरी यांच्या प्रकृतीत सुधारणा होईल. जे उपचार करायचे आहेत ते ज्युपिटरमध्ये करणार आहोत, असं एकनाथ शिंदे म्हणाले.ज्युपिटरमध्ये अधिक सुविधा उपलब्ध असल्यानं तिथं उपचार करणं सोयीचं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या ज्येष्ठ भगिनी अरुणाताई गडकरी यांची आज ठाण्यातील कौशल्य हॉस्पिटल येथे जाऊन भेट घेतली.
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) May 21, 2024
गेल्या काही दिवसांपासून अरुणाताईंची तब्येत बरी नसल्याचे त्यांना कौशल्य हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. आज त्यांची भेट घेऊन त्यांच्या… pic.twitter.com/1qKehX02F8
नरेश मस्के काय म्हणाले?
धर्मवीर आनंद दिघे यांच्या ज्येष्ठ भगिनी अरुणाताई गडकरी यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील कौशल्य हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून अरुणाताईंची तब्येत बरी नसल्याचे समजल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.अरुणाताई गडकरी यांना पॅरालिटीकचा झटका आल्यानंतर त्यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले.सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. आता अरुणाताईंची प्रकृती स्थिरावलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर लक्ष ठेवून आहेत. अरुणाताई लवकरात लवकर बऱ्या होतील, असं नरेश म्हस्के म्हणाले.
पाहा व्हिडीओ :