एक्स्प्लोर

धक्कादायक! दुचाकीस्वारांचा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या वाहतूक पोलिसावर हल्ला; आरोपी फरार

ठाण्यातील मिरा रोड येथील काशीमीरा परिसरात कर्तव्य बजावत असताना वाहतूक पोलिसावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना  समोर आली आहे.

Thane Crime News : ठाण्यातील मिरा रोड येथील काशीमीरा परिसरात कर्तव्य बजावत असताना वाहतूक पोलिसावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना  समोर आली आहे. वाहतूक पोलीस किरण सहाणे हे अमर पॅलेस परिसरात वाहतूक नियंत्रणाचे काम करत होते. यावेळी ही घटना घडली. दोन दुचाकीस्वारांमध्ये एकमेकांना कट मारण्याच्या कारणावरुन जोरदार वाद सुरु झाला होता. सदर वाद मिटवण्यासाठी पोलीस किरण सहाणे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच वेळी एका दुचाकीस्वाराने संतापाच्या भरात सहाणे यांच्यावरच हल्ला करत त्यांना मारहाण केली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मारहाण करणारा दुचाकीस्वार घटनास्थळावरून फरार झाला

घटनेनंतर मारहाण करणारा दुचाकीस्वार घटनास्थळावरून फरार झाला आहे. या प्रकरणी काशीमीरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, कर्तव्यावर असलेल्या पोलिसावरच हल्ला झाल्यामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला, त्यानंतर तरुणानं संपवलं जीवन

पुण्यातील जुन्नर तालुक्यात खळबळजनक घटना घडली आहे. एकतर्फी प्रेमातून तरुणाने तरुणीवर आधी जीवघेणा हल्ला केला आणि मग स्वतः गळफास घेत आत्महत्या केली आहे. एकतर्फी प्रेमातून टोकाचे पाऊल उचलणाऱ्या तरुणाचे नाव महेश डामसे होते. या घटनेमुळं खळबळ उडाली आहे. अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

जुन्नर पोलीसांनी महेशचा शोध सुरु केला असता आढळला मृतदेह

महेशचे डामसेचे एका तरुणीवर प्रेम होते, मात्र ती लग्नाला होकार देत नव्हती. या रागातून त्याने तरुणीवर हल्ला करण्याचा कट आखला. जुन्नरमधील एका वस्तीगृहातून ही तरुणी महाविद्यालयात निघाली होती. तेव्हा सरकारी रुग्णालयाच्या मागे महेशने तिला गाठले आणि कोयत्याने तिच्या डोक्यावर-चेहऱ्यावर वार केले. बुधवारी सकाळी घडलेल्या या धक्कादायक घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली. त्यानंतर जुन्नर पोलीसांनी महेशचा शोध सुरु केला. तेव्हा आज सकाळी एका टेकडीवर महेशची गाडी आढळली तर तिथंच एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. सीसीटीव्हीमध्ये त्या परिसरात तो एकटाच गेल्याचं दिसून आलं, त्यामुळं ही आत्महत्या असल्याचं दिसून येत आहे. एकतर्फी प्रेमातून घडलेल्या या घटनेनं जुन्नर तालुका हादरुन गेला आहे.

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ह्रदयद्रावक घटना... लातूरमध्ये दोन चिमुकल्यांसह आईची विहिरीत उडी; परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी
ह्रदयद्रावक घटना... लातूरमध्ये दोन चिमुकल्यांसह आईची विहिरीत उडी; परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी
ऑनलाईन जुगारात तरुण कर्जबाजारी! चोरी करुन कर्ज फेडण्याचा प्रकार उघड, रायगड पोलिसांची कारवाई 
ऑनलाईन जुगारात तरुण कर्जबाजारी! चोरी करुन कर्ज फेडण्याचा प्रकार उघड, रायगड पोलिसांची कारवाई 
धक्कादायक! मुंबईत एका भोंदूबाबाला अटक, महिलांना बेशुद्ध करुन अत्याचार करत असल्याचा आरोप
धक्कादायक! मुंबईत एका भोंदूबाबाला अटक, महिलांना बेशुद्ध करुन अत्याचार करत असल्याचा आरोप
Thane Crime News :कल्याण टिटवाळ्यातील हायप्रोफाईल सोसायटीत मुंबई पोलिसांची धाड; 6 कोटींच्या अमली पदार्थांच्या 5 हजार गोळ्या जप्त, महिलेला अटक
कल्याण टिटवाळ्यातील हायप्रोफाईल सोसायटीत मुंबई पोलिसांची धाड; 6 कोटींच्या अमली पदार्थांच्या 5 हजार गोळ्या जप्त, महिलेला अटक
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Parth Pawar On Baramati Bypoll : बारामतीत मुद्दाम काही लोकांना उभा केला, पार्थ पवार यांचा मोठा आरोप
Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arvind Kejriwal : दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात केजरीवालांना धक्का; न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा माघार न घेण्यावर ठाम
दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात केजरीवालांना धक्का; न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा माघार न घेण्यावर ठाम
IPS Transfer : राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
Mahesh Shinde : एकनाथ शिंदेंच्या सभेत आमदार महेश शिंदेंना मोठा धक्का, कोरेगावचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे भाजपमधून शिवसेनेत दाखल
कोरेगावच्या माजी नगराध्यक्षांनी आमदार महेश शिंदेंची साथ सोडली, राजाभाऊ बर्गेंच्या हाती कमळाऐवजी धनुष्यबाण
कायद्यात भाषेची सक्ती नाही, गुणरत्न सदावर्तेंचा रिक्षाचालकांच्या मराठी भाषा सक्तीला विरोध; आयुक्तांना निवेदन
कायद्यात भाषेची सक्ती नाही, गुणरत्न सदावर्तेंचा रिक्षाचालकांच्या मराठी भाषा सक्तीला विरोध; आयुक्तांना निवेदन
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
Female CM India: काँग्रेस आणि भाजप, कोणत्या राज्यात कोणत्या पक्षानं मुख्यमंत्री पदावर महिलांना दिली संधी?
काँग्रेस आणि भाजप, कोणत्या राज्यात कोणत्या पक्षानं मुख्यमंत्री पदावर महिलांना दिली संधी?
बनावट जातप्रमाणपत्र, नॉट रिचेबल सहर शेख माध्यमांसमोर; म्हणाल्या, आरोप बिनबुडाचे, वानखेडेतील फोटोवरही स्पष्टीकरण
Video: बनावट जातप्रमाणपत्र, नॉट रिचेबल सहर शेख माध्यमांसमोर; म्हणाल्या, आरोप बिनबुडाचे, वानखेडेतील फोटोवरही स्पष्टीकरण
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 एप्रिल 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 एप्रिल 2026 | सोमवार
Embed widget