एक्स्प्लोर

डोंबीवलीतील शक्तिशाली स्फोटाची विदारक कहाणी, मृतदेहाचे अवयव छतावर; 45 तासांनंतरही शोधकार्य सुरूच!

Dombivili MIDC Blast: सकाळपासून अनेक मानवी अवशेष आसपासच्या कंपनीच्या ढिगार्‍याखाली आणि काही अवशेष छतांवर पडलेले एनडीआरएफ जवानांना आढळले आहेत.

मुंबई : डोंबिवलीच्या (Dombivli MIDC Blast News)  अमुदान कंपनीत स्फोट होऊन आता जवळपास दोन दिवस झाले, पण घटनास्थळावर अजूनही मानवी अवशेष सापडत आहेत. शोधकार्यात गुंतलेल्या एनडीआरएफच्या जवानांना आजही अनेक ठिकाणी मानवी अवशेष सापडले. काही अवशेष ढिगाऱ्याखाली आढळले, तर काही आसपासच्या कंपन्यांवर सापडले. आज संपूर्ण दिवस शोधकार्य सुरू राहणार आहे. काल रात्री दोन वेळा एका कंपनीमध्ये छोट्या प्रमाणात आग लागली होती. मात्र ती ताबडतोब विझवण्यात आल्यानं पुढचा अनर्थ टळला. त्यामुळे इथे असलेल्या सर्व कंपन्यांमधील रासायनिक द्रव्य ताबडतोब दुसरीकडे नेण्याचं काम सुरू आहे.

डोंबिवली स्फोट झाल्यानंतर कित्येक तास उलटले आहेत मात्र अजूनही घटनास्थळावरून मानवी अवशेष सापडत आहेत.  आज सकाळपासून अनेक मानवी अवशेष आसपासच्या कंपनीच्या ढिगार्‍याखाली आणि काही अवशेष छतांवर पडलेले एनडीआरएफ जवानांना आढळले आहेत. आज पूर्ण दिवस एनडीआरएफचे जवान सर्च ऑपरेशन राबवणार आहेत. शुक्रवारी रात्री दोन वेळेस एका कंपनीमध्ये छोट्या प्रमाणात आग लागली होती मात्र ती आग ताबडतोब अग्निशमन दलाने विझवली.   त्यामुळे इथे असलेल्या सर्व कंपन्यांमधील रासायनिक द्रव्य ताबडतोब दुसरीकडे नेण्याचं काम आता सुरू करण्यात आला आहे, जेणेकरून पुन्हा आजची घटना होऊ नये. दुसरीकडे आज अटक केलेल्या आरोपींना कल्याण कोर्टात हजर केल्या जाईल, त्या ठिकाणी त्यांना पोलीस कोठडी मिळते की न्यायालयीन कोठडी मिळते हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे .  डोंबिवली बॉयलर स्फोट दुर्घटनेत 10 कामगारांचा मृत्यू तर  60 कामगार जखमी झाले आहेत.

स्फोट प्रकरणात कंपनीच्या दोन्ही मालकांना अटक 

डोंबिवलीतल्या अमुदान कंपनी स्फोट प्रकरणात कंपनीच्या दोन्ही मालकांना अटक करण्यात आली. अमुदान कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहता यांना अटक झाली. आज  दोघांनाही कोर्टात हजर करण्यात येईल. मालती मेहतांना नाशिकमधून अटक करण्यात आली. तर मलय मेहतांना ठाण्यातून अटक झालीय. स्फोट झाल्यानंतर मालती मेहता यांनी नाशिकमधील आपल्या नातेवाईकांच्या घरी आश्रय घेतला होता.  

 बफर झोन गायब केल्याचा फटका

डोंबिवली शहरात असलेल्या एमआयडीसीच्या भौगोलिक स्थितीवरून आता वाद सुरू झालेत. नागरी वस्तीला लागून एवढी मोठी एमआयडीसी कशी असा सवाल विचारला जातोय. मात्र बफर झोन गायब केल्याचा फटका बसल्याचा आरोप करण्यात येतोय. एमआयडीसी स्थापन केली तेव्हा 4 ते 5 किलोमीटरचा पट्टा बफर झोन म्हणून प्रस्तावित होता. पण तत्कालीन काही मंडळींनी अधिकाऱ्यांना हाताशी घेत बफर झोन गायब करत इमारती बांधल्या असा आरोप करण्यात येतोय.  

Video :

हे ही वाचा:

बॉयलरचा तुकडा दीड किमी उडून कारवर पडला, प्रत्यक्षदर्शींनी डोंबिवली स्फोटाची हादरवणारी कहाणी सांगितली!

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य

व्हिडीओ

Parbhani Akola Special Report : समस्या बेसुमार, मतदानावर बहिष्कार;परभणी अकोल्यातील नागरिकांचा निर्णय
Raj Thackeray Sena Bhavan हाकेच्या अंतरावर सेनाभवन,जायला 20 वर्ष, राज ठाकरे भावूक Special Report
Thackeray Brothers Vachanam Special Report ठाकरे बंधूंचा मुंबई महापालिकेसाठी वचननामा,सेनाभाजपची टीका
Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
Narayan Rane Sindhudurg Speech : आता घरी बसायचं...नारायण राणेंचा राजकीय सन्यास, भावनिक भाषण UNCUT

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
BMC Election 2026: मुंबईत राज-उद्धव ठाकरे एकत्र येण्याचा फायदा होणार नाही कारण...; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली भाजपची ती थिअरी
मुंबईत राज-उद्धव ठाकरे एकत्र येण्याचा फायदा होणार नाही कारण...; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली भाजपची ती थिअरी
Jay Dudhane First Reaction After Arrested: मी हनिमूनसाठी जात होतो आणि...; अटकेनंतर जय दुधाणे नेमकं काय म्हणाला?
मी हनिमूनसाठी जात होतो आणि...; अटकेनंतर जय दुधाणे नेमकं काय म्हणाला?
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
Embed widget