(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mahesh Gaikwad : गणपत गायकवाडांनी ज्यांच्यावर गोळीबार केला, त्या शिंदे गटाच्या महेश गायकवाडांना जीवे मारण्याची धमकी
Kalyan News : काही दिवसांपूर्वी भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरमधील पोलिस स्टेशनमध्येच शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता.
कल्याण : नवनिर्वाचित खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांचे विश्वासू आणि कल्याण शहर शिवसेना प्रमुख असलेल्या महेश गायकवाडांना (Mahesh Gaikwad) जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. फेसबुक मेसेंजवर ही धमकी दिल्याची माहिती आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दलही अपशब्द वापरण्यात आले आहेत. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिस तपास करत आहेत.
उल्हासनगरमधील हिललाईन पोलीस स्टेशनमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस स्टेशनमध्येच गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा महेश गायकवाड यांना जीवे मारण्याची धमकी फेसबुकच्या मेसेंजरवरून देण्यात आली आहे.
या धमकीची दखल कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी घेऊन अज्ञात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे. आरोपी कोण आहे त्याने का धमकी दिली याबाबत कल्याण कोळशेवाडी पोलीस अधिक तपास करत आहेत. धमकी देणाऱ्याचं नाव हे दीपक कदम असं असून तो पालीमधील असल्याची माहिती फेसबुकच्या पेजवरून समोर येतेय.
महेश गायकवाडांना काय धमकी दिली?
अभी तेरा मेरा कॉन्टॅक्ट सुरू...
देख तो कितना जादा लंबा,
और मै देख कितना लंबा जाता हू!
पुरी डालुंगा उसने दो कम डाली.
मै पुरे आठ के आठ डालुंगा कम नही करुंगा,
साला जिंदा नही रहना मंगता है.
साला बच गया तू वह गलती किया उसने गणपत गायकवाड ने.
कुत्ता है मुख्यमंत्री उसको पता नही है उसके ग*** पर लाथ मिलने वाली है, लेकिन ओ साला किधर समजता है!
और तू गया उसकी जान पर उठ रहा है तेरा गेम आयेगा तुझे मालूम नही,
महेश गायकवाड, तू मेरा कुछ नही बिघड सकता. तेरेको खुला चॅलेंज देता हु तेरा गेम बजेगा ध्यान मे रखना.
जिस चीज का पत्ता बांध के तू जी रहा है ना तेरा तो विकेट 100%.
गणपत गायकवाडांचा पोलिस स्टेशनमध्येच गोळीबार
भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर हिल लाइन पोलीस ठाण्यात गोळीबार केला होता. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. हा सर्व थरार पोलिस स्टेशनच्या सीसीटिव्हीत कैद झाला.
ही बातमी वाचा: