Bhiwandi : 'टिट्या'चा वाढदिवस आणि गावाचा जल्लोष, रेड्याच्या वाढदिवसाचं जबरदस्त सेलिब्रेशन, जंगी पार्टीचाही बेत
Bhiwandi News : भिवंडीतील लाखीवली गावात एका रेड्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला असून त्यावेळी अख्ख्या गावाने जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं.
![Bhiwandi : 'टिट्या'चा वाढदिवस आणि गावाचा जल्लोष, रेड्याच्या वाढदिवसाचं जबरदस्त सेलिब्रेशन, जंगी पार्टीचाही बेत bhiwandi reda birthday celebration news thane lakhiwali buffalo marathi news update Bhiwandi : 'टिट्या'चा वाढदिवस आणि गावाचा जल्लोष, रेड्याच्या वाढदिवसाचं जबरदस्त सेलिब्रेशन, जंगी पार्टीचाही बेत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/01/3fc40b76b091c46d782f7e92b2bec22d169615722776993_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
ठाणे : विविध पाळीव प्राण्यांची बहुतांश लोकांना खूपच आवड असते. त्यामुळे घरातील सदस्यांप्रमणेच त्या पाळीव प्राण्यांची काळजी घेत असल्याचे आजपर्यंत आपण पहिले असेल. इतकंच नाही तर त्यांचे वाढदिवस देखील साजरे करतात. असाच एक अनोखा वाढदिवस सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. हा वाढदिवस एका रेड्याचा. होय या रेड्याचा ज्याचं नाव 'टिट्या' आहे. त्याचा वाढदिवस (Bhiwandi Reda Birthday Celebration) अख्या गावाने साजरा केला.
जणू एखाद्या राजकीय नेत्याच्या वाढदिवसाप्रमाणेच पूर्ण गावाने जल्लोश केला. आता त्या रेड्याचा वाढदिवसाचा व्हिडीओ पाहून तुम्हाला देखील प्रश्न पडेल की, खरंच हा एखाद्या रेड्याचाच वाढदिवस होता का?
टिट्याने अनेक पुरस्कार मिळवले
भिवंडी (Bhiwandi News) तालुक्यामधील लाखीवली गावात रहाणारे तांडेल यांचा हा रेडा असून त्याचा तिसरा वाढदिवस जंगी साजरा करण्याचे ठरवले होते. या रेड्याचं नाव 'टिट्या' असं आहे. तांडले कुटुंबाचे या रेड्यावर खूप प्रेम आहे. हा रेडा झुंज खेळण्यात पटाईत असून त्याने आतापर्यत अनेक झुंजी खेळून पुरस्कार आणि प्रसिद्धी मिळाली. त्यामुळे दरवर्षी ते या लाडक्या 'टिट्या'चा वाढदिवस असाच जल्लोष करून साजरा करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
रेड्याच्या वाढदिवशी गावाला जंगी पार्टी
'टिट्या' रेड्याच्या वाढ दिवस 28 सप्टेंबर रोजी होता. त्याला वाढदिवशी सजवलं जाते. त्याच्यासाठी खास आवडते पदार्थ तयार केले जातात. खास केकही तयार केला. एवढंच नाही तर पूर्ण गावाला जंगी पार्टी दिली जाते. रात्री फटाक्यांची आतिशबाजी करून जोशात त्याचा वाढदिवस दरवर्षी साजरा केला जातो. अशाच प्रकारे याही वर्षी 'टिट्या'चा वाढदिवस साजरा करण्यात आला. या जल्लोषाचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर भलताच व्हायरल होत आहेत.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)