एक्स्प्लोर

Lok Sabha Election : मी भाजपचा सच्चा कार्यकर्ता, जर उमेदवारी नाकारली तर; तिकीट कापण्याच्या चर्चेवर काय म्हणाले भाजपचे खासदार? 

Wardha Loksabha Election : वर्ध्यातून भाजपकडून रामदास तडस यांचे तिकीट कापले जाणार असून त्या ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी देण्याची चर्चा आहे. 

वर्धा : मी भाजपचा (BJP) सच्चा कार्यकर्ता असून भाजपशी कायम एकनिष्ठ राहणार असल्याचं वक्तव्य वर्धाचे खासदार रामदास तडस (Ramdas Tadas) यांनी केलंय. आम्ही कोणत्या पदासाठी काम करत नाही तर पक्षासाठी काम करतोय असंही ते म्हणाले. रामदास तडस यांचे येत्या लोकसभेसाठी (Loksabha Election) तिकीट कापले जाणार असून त्यांच्या जागी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना रामदास तडस यांनी हे वक्तव्य केलं. 

वर्ध्याच्या पवनार येथे महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत खासदार रामदास तडस यांनी स्वच्छता केली. त्यावेळी त्यांना विचारलेल्या प्रश्नाला खासदार तडस यांनी उत्तर दिले आहे.

वर्ध्यातून चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी? 

सध्या भाजपच्या लोकसभेच्या रणनीतीची चर्चा सर्वत्र होत आहे. महाराष्ट्रात 45 पेक्षा जास्ता जागा जिंकण्यासाठी भाजपने रणनीती आखली असल्याची सूत्रांची माहिती आहे. भाजपमधील महाराष्ट्रातील पाचच्या वर नेत्यांना लोकसभेच्या निवडणुकीत उतरवले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामध्ये वर्ध्यातून खासदार रामदास तडस यांचे तिकीट कापले जाणार असून येथे भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुडे यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता आहे.

मात्र वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांनी या वृत्ताचे खंडन करत आम्ही पदासाठी नाही तर कार्यकर्ता म्हणून भाजपमध्ये काम करतो आहे असं म्हटलं. कुणालाही तिकीट मिळालं तरी भाजपसोबत राहूनच काम करणार असल्याची प्रतिक्रिया खासदार रामदास तडस यांनी दिली आहे. 

या मतदारसंघांवर भाजपचे विशेष लक्ष

येत्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी बुलढाणा, चंद्रपूर, हिंगोली, औरंगाबाद, पालघर, कल्याण, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, रायगड, बारामती, शिरूर, शिर्डी, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघांवर भाजपने लक्ष केंद्रित केलं आहे. बारामती, मावळ, सोलापूर, कोल्हापूर, सातारा या मतदारसंघात  भाजप आपली ताकद लावणार आहे.  यामध्ये 18 मतदारसंघात भाजप विशेष लक्ष देणार आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) भाजपने (BJP) कंबर कसली असून त्याची जोरदार तयारी सुरू केल्याचं चित्र आहे. मिशन 45 साठी भाजपची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीत मिशन 45 प्लससाठी भाजपनं मोठी खेळी केल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र भाजपमधील अनेक मोठ्या चेहऱ्यांना लोकसभेचं तिकीट दिलं जाणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
Embed widget