एक्स्प्लोर

Bhiwandi : भिवंडीत खासगी संस्थेच्या जागेवर कब्रस्तान बांधण्याचा घाट? भाजप आमदार आणि समाजवादीच्या आमदारात विधानसभेत जुंपली

Bhiwandi : भिवंडीतील एका खासगी जागेत कब्रस्तान बांधण्यात येत असल्याचा आरोप भाजप आमदार योगेश सागर यांनी केला. त्यानंतर त्याला समाजवादी रईस शेख यांनी आक्षेप घेतला. 

ठाणे : भिवंडीच्या कणेरी परिसरातल्या एका खासगी संस्थेच्या जागेवर कब्रस्तान बांधलं जात असल्याचा आरोप भाजप आमदार योगेश सागर यांनी विधानसभेत केला. यावरुनच भाजप आमदार योगेश सागर (Yogesh Sagar) आणि भिवंडी पूर्वचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख (Rais Shaikh) यांच्यात विधानसभेत खडाजंगी झाली. 

काय आहे प्रकरण? 

भिवंडीतील मौजे कणेरीतली सर्व्हे नंबर 26 ही जागा गोपाळ गणेश दांडेकर ट्रस्टची खाजगी मालमत्ता आहे.त्या जागेची खोटी कागदपत्रं सादर करुन, तिथं कब्रस्तान बांधण्याचा घाट घातला जात आहे, यावरून लोकांचा उद्रेक होत असून याची तात्काळ सखोल चौकशी करण्यात यावी आणि तातडीनं काम थांबवावं अशी मागणीही योगेश सागर यांनी केली. 

भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी योगेश सागर यांच्या मुद्द्याला हरकत घेऊन सदर जागा मुंबई महापालिकेनं उपलब्ध करुन दिल्याचं म्हटलं. याशिवाय या जागेबाबत जिल्हाधिकारी यांनी बैठका घेतल्या होत्या, तसेच या जागेसाठी शासनाकडून निधीही उपलब्ध करण्यात आला होता असा दावा रईस शेख यांनी विधानसभेत केला. जर योगेश सागर यांचा मुद्दा वैध असेल तर शासनपत्रक आणून संबंधित काम थांबवलं जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. या प्रकरणी मुद्दा उपस्थित झाल्यानंतर तालिका अध्यक्षांनी या प्रकरणात सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

दांडेकर ट्रस्टची बाजू काय? 

या प्रकरणात दांडेकर ट्रस्टनं संबंधित प्रशासकीय विभागाकडे तक्रार दाखल केली आहे.ही जागा आपल्या मालकीची असून शासकीय विभागांची फसवणूक झाल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.
 
ट्रस्टने त्यांच्या तक्रारीत म्हटल्यानुसार, ट्रस्टच्या मालकीची एकूण नऊ एकर जमीन असून सदरच्या जमिनीवर हनुमानाचं मंदिर आहे. या जमिनीचा वापर पूर्वीपासून सामाजिक कामांसाठी केला जातो. या जमिनीपैकी काही भागांवर अतिक्रमणं झाली असून भिवंडी मनपा प्रशासन आणि संबंधित पोलीस स्टेशनलासुद्धा कळवले आहे. आमच्या ट्रस्टच्या मालकीच्या जमिनीवर शासनाच्या निधीतून कब्रस्तान तयार करण्यात आलं असून त्याला आमचा तीव्र विरोध आहे. ही जमीन शासनाची दिशाभूल करून बळकावण्याचा प्रकार असून बेकायदेशीर कब्रस्तानामुळे परिसरातील सर्वसामान्य जनतेमध्ये रोष परसल्याचं दिसतंय. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते तसेच धार्मिक तेढ निर्माण होऊ शकते. त्यामुळे याची त्वरीत दखल घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भारताच्या द्वेषाचा मालदीवलाच फटका, भारताने दान केलेली विमाने उडवण्यासाठी सक्षम वैमानिकही नाही
भारताच्या द्वेषाचा मालदीवलाच फटका, भारताने दान केलेली विमाने उडवण्यासाठी सक्षम वैमानिकही नाही
Thane Local : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ठाणे स्थानकात सिग्नल यंत्रणेत मोठा बिघाड: ABP Majha
Thane Local : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ठाणे स्थानकात सिग्नल यंत्रणेत मोठा बिघाड: ABP Majha
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
Abdu Rozik : अब्दु रोझिकचा साखरपुडा हा पब्लिसिटी स्टंट? स्वत: सांगितले, एका कमी उंचीच्या...
अब्दु रोझिकचा साखरपुडा हा पब्लिसिटी स्टंट? स्वत: सांगितले, एका कमी उंचीच्या...
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 AM : 13 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines :  9  AM : 13 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सAmol Kolhe Shirur Loksbaha Voting : माझं लीड कीती हे मतदार राजा सांगेल : अमोल कोल्हेShirdi Water Issue :  पाण्यासाठी कसरत, शिर्डीतील महिला मतदारांसोबत संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारताच्या द्वेषाचा मालदीवलाच फटका, भारताने दान केलेली विमाने उडवण्यासाठी सक्षम वैमानिकही नाही
भारताच्या द्वेषाचा मालदीवलाच फटका, भारताने दान केलेली विमाने उडवण्यासाठी सक्षम वैमानिकही नाही
Thane Local : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ठाणे स्थानकात सिग्नल यंत्रणेत मोठा बिघाड: ABP Majha
Thane Local : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ठाणे स्थानकात सिग्नल यंत्रणेत मोठा बिघाड: ABP Majha
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
Abdu Rozik : अब्दु रोझिकचा साखरपुडा हा पब्लिसिटी स्टंट? स्वत: सांगितले, एका कमी उंचीच्या...
अब्दु रोझिकचा साखरपुडा हा पब्लिसिटी स्टंट? स्वत: सांगितले, एका कमी उंचीच्या...
Subodh Bhave :
"बदल घडवायचा असेल तर घराबाहेर पडा आणि मत द्या"; अभिनेता सुबोध भावेचं मतदारांना आवाहन
मुंबईत पावसाचा अंदाज, ठाणे-रायगडमध्ये यलो अलर्ट;  मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा
मुंबईत पावसाचा अंदाज, ठाणे-रायगडमध्ये यलो अलर्ट; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा
Lok Sabha Election 4 Phase Voting : लोकसभेची रणधुमाळी : चौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान, अखिलेश यादव, असदुद्दीन ओवेसी ते दानवेंच्या भविष्याचा फैसला होणार
Lok Sabha Election 4 Phase : लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान, अखिलेश यादव, ओवेसी ते दानवेंच्या भविष्याचा फैसला होणार
Allu Arjun : हैदराबादमधून अल्लू-अर्जुन मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर; पाहा फोटो
हैदराबादमधून अल्लू-अर्जुन मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर; पाहा फोटो
Embed widget