एक्स्प्लोर
फ्लिपकार्टवर 48 हजारांचा कॅमेरा मागवला, हाती पाईपचे तुकडे
सचिन ढोले नावाच्या तरुणानं फ्लिपकार्टवरुन Nikon D5300 Camera लेन्ससह मागवला होता.
मुंबई : फ्लिपकार्टच्या अजब कारभाराचा फटका मुंबईतल्या एका तरुणाला बसला आहे. तब्बल 48 हजार रुपयांच्या कॅमेरा बूक केल्यावर त्याच्या हाती चक्क पाईपचे तुकडे आणि इलेक्ट्रिक उपकरण पडलं.
सचिन ढोले नावाच्या तरुणानं फ्लिपकार्टवरुन Nikon D5300 Camera लेन्ससह मागवला होता. या कॅमेराची किंमत 48 हजार 490 रुपये असून सचिनने क्रेडीट कार्डद्वारे पेमेंट केलं होतं.
दहा फेब्रुवारीला सचिनच्या ऑफिसच्या पत्त्यावर फ्लिपकार्टने डिलीव्हरी दिली. पार्सल ऑफिसमध्ये सिक्युरिटीने कलेक्ट केलं. संध्याकाळी त्याने पार्सल उघडलं तेव्हा कॅमेराच्या बॅग व्यतिरिक्त लोखंडी पाईपचे तुकडे मिळाले.
दरम्यान, या फसवणुकीबद्दल सचिन ढोलेने पोलिसात तक्रार दिली आहे. फ्लिपकार्टने कॅमेरा देण्याचं आश्वासन दिलं आहे. मात्र हा प्रकार घडला कसा, याबाबत अद्याप फिल्पकार्टनं स्पष्टीकरण दिलेलं नाही.
@Flipkart मी काल Nikon D5300 कॅमेरा (किंमत ४८९०० )ओर्डर केला आणि मला त्याच box मध्ये लोखंडी पाईप चे तुकडे पाठवले आहेत, ते पार्सल त्यांच्याच @ekart यांनी पोहचवले. @Flipkart ची किती दिवस वाट बघायची pic.twitter.com/xRiIDrBpMm
— SACHIN DHOLE (@EditorSachin) February 10, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement