एक्स्प्लोर
घरबसल्या तुमचं सिम आधारने व्हेरिफाईड करा
री-व्हेरीफेशनची प्रक्रिया सोपी केली जाणार असल्यामुळे तुम्हाला घरबसल्या सिम व्हेरिफाईड करता येईल.
नवी दिल्ली : सिम कार्ड आधार नंबरशी व्हेरिफाईड करण्याची प्रक्रिया सोपी होणार आहे. री-व्हेरीफेशनची प्रक्रिया सोपी केली जाणार असल्यामुळे तुम्हाला घरबसल्या सिम व्हेरिफाईड करता येईल. पीटीआयने याबाबत वृत्त दिलं आहे.
मोबाईल क्रमांक आधारशी लिंक करण्यासाठी वन टाईम पासवर्ड (ओटीपी) आणि घरबसल्या सिम व्हेरिफिकेशन सुविधा सरकारकडून दिली जाणार असल्याची माहिती आहे. मोबाईल क्रमांक आधारशी लिंक करण्यासाठी आतापर्यंत आधार नोंदणी केंद्रावर जावं लागत होतं. त्यामुळे आता तुमचा मोबाईल क्रमांक आधारशी लिंक केलेला असेल तर ओटीपीच्या माध्यमातून सिम व्हेरिफिकेशन करता येईल.
फेब्रुवारी 2018 पर्यंत सिम व्हेरिफिकेशन करण्याची मुदत आहे. मात्र डेडलाईनपूर्वीच आधार अनिवार्य करण्याची मुदत 31 मार्च 2018 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
री-व्हेरिफिकेशन प्रक्रिया ग्राहकांच्या घरी उपलब्ध करुन द्यावी, असे आदेश सरकार दूरसंचार कंपन्यांना देणार आहे. वृद्ध, दिव्यांग आणि आजारी असलेल्या ग्राहकांना याचा फायदा होईल, असं सरकारने म्हटलं आहे.
नवीन सिम घेणाऱ्या ग्राहकांसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आलं आहे. मात्र जुन्या ग्राहकांना ठरवून दिलेल्या मुदतीतच री-व्हेरिफिकेशन करावं लागणार आहे.
सध्याच्या ग्राहकांसाठी ओटीपीवर आधारित व्हेरिफिकेशन प्रक्रियाही सुरु करण्यात आली आहे. याबाबत दूरसंचार कंपन्यांना आदेश देण्यात आला आहे. एसएमएस, आयव्हीआरएस किंवा कंपनीच्या मोबाईल अॅपचा यासाठी वापर करता येणार आहे.
एखाद्या ग्राहकाचा मोबाईल क्रमांक आधार डेटाबेसमध्ये म्हणजे आधार कार्डशी लिंक असेल, तर त्याच्या आधारावर ओटीपीच्या माध्यमातून सिम व्हेरिफिकेशन करता येईल. शिवाय संबंधित व्यक्तिच्या नावावर असलेल्या इतर सिमचंही व्हेरिफिकेशन करणं शक्य होईल. जवळपास 50 कोटी नंबर आधीपासूनच आधार डेटाबेसमध्ये नोंदणीकृत आहेत. ज्याचा वापर करुन सिम व्हेरिफिकेशन करता येणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement