Twitter Varification : ट्विटरवर तुम्ही देखील मिळवू शकता 'ब्लू टिक', कसं कराल अप्लाय?
ब्लू टिक मिळवण्यासाठी तुम्ही सरकार, कंपनी किंवा ब्रँड आणि ऑर्गनायजेशन, न्यूज ऑर्गनायजेशन किंवा जर्नलिस्ट, एंटरटेनमेंट, स्पोर्ट्स आणि गेमिंग, अॅक्टिविस्ट या कॅटेगरीमध्ये असणे आवश्यक आहे.
मुंबई : मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटर (Twitter) आपली वेरिफिकेशनची प्रक्रिया सुरू करत आहे. यानंतर यूजर्सना आपल्या ट्विटर अकाउंटवर ब्लू टिक देखील मिळू शकेल. मात्र यासाठी यूजरला ट्विटरने केलेल्या कॅटेगरीमध्ये फिट व्हाव लागेल. आपण या कॅटेगरीमध्ये बसत असल्यास, आपल्या अकाऊंटला ब्लू टिक मिळू शकते. ब्लू टिकसाठी कोणीही अर्ज करू शकतो. आता प्रश्न असा आहे की यासाठी अर्ज कसा करावा.
ब्लू टिकसाठी कोण अर्ज करू शकतो?
ट्विटरच्या मते, ब्लू टिक मिळवण्यासाठी यूजरचं अकाऊंट Authentic, Notable आणि Active असणे अनिवार्य आहे. यामध्ये Authentic म्हणजे अकाऊंट फेक नसून खरंखुरं असणे आवश्यक आहे. Notable म्हणजे ट्विटरने तयार केलेल्या सहा प्रकारांपैकी एकामध्ये फिट होणे आवश्यक आहे. सरकार, कंपनी किंवा ब्रँड आणि ऑर्गनायजेशन, न्यूज ऑर्गनायजेशन किंवा जर्नलिस्ट, एंटरटेनमेंट, स्पोर्ट्स आणि गेमिंग, अॅक्टिविस्ट या कॅटेगरी आहेत.
तसेच अकाऊंट अॅक्टिव म्हणजे आपण गेल्या सहा महिन्यांपासून हे अकाऊंट सतत वापरत असणे आवश्यक आहे. तसेच अकाऊंटवर आपली माहिती असते म्हणजे यूजरचं नाव आणि प्रोफाइल फोटो यासारखी आपली माहिती असावी. इतकेच नाही तर तुमच्या अकाऊंटचा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबरही असावा. याशिवाय नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आपणास ट्विटरद्वारे बंदी घातलेली नसावी. आपण या सर्व अटींमध्ये बसत असल्यास आपण ब्लू टिकसाठी अर्ज करू शकता.
अर्ज कसा करावा?
ब्लू टिकसाठी अप्लाय करण्यासाठी यूजरला अकाऊंट सेटिंगमध्ये जाऊन 'Request Verification' वर क्लिक करावं लागेल. मात्र अद्याप हे बटन दिसत नाहीये, लवकरच दिसू लागेल. या बटनवर क्लिक करण्यासाठी आपल्या संबंधित कॅटेगरी सिलेक्ट करावी लागेल. तसेच आयडी कार्ड देऊन पुरावा द्यावा लागेल. या व्यतिरिक्त अधिकृत वेबसाइटची लिंकही द्यावी लागेल जी आपल्या ट्विटर खात्याची पुष्टी देईल.
अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, आपल्याला काही दिवसांनंतर ट्विटरकडून मेल प्राप्त होईल. आपला अर्ज मंजूर झाल्यास आपोआप ब्लू टिक आपल्या अकाऊंटसमोर दिसेल. तुम्हीज या कॅटेगरिजमध्ये बसत नसाल तर काही काळानंतर ट्विटर आणखी कॅटेगरी अॅड होणार आहेत.