एक्स्प्लोर
शाओमीचा रेडमी 4A स्मार्टफोन लाँच, किंमत 5,999 रु.

मुंबई: चीनी स्मार्टफोन कंपनी शाओमीनं आपला नवा स्मार्टफोन रेडमी 4A आज लाँच केला. या स्मार्टफोनची किंमत 5,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन 4G VoLTE सपोर्टिव्ह आहे. डार्क ग्रे, गोल्ड आणि रोज गोल्ड या कलरमध्ये हा फोन उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन अॅमेझॉन इंडिया आणि mi.com वर उपलब्ध आहे. हा बजेट स्मार्टफोन असल्यानं याला ग्राहक कसा प्रतिसाद देतात ते पाहणं गरजेचं आहे. शाओमी रेडमी 4A स्मार्टफोनचे खास फीचर्स: - 5 इंच स्क्रिन आणि रेझ्युलेशन 720x1280 पिक्सल - ड्यूल सिम आणि पॉलिकार्बोनेट बॉडी - मार्शमेलो 6.0 ऑपरेटिंग सिस्टम - 1.4Ghz क्वॉड कोअर स्नॅपड्रॅगन 425 प्रोसेसर आणि 2जीबी रॅम - 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा - 16 जीबी इंटरनल मेमरी असून 128 जीबीपर्यंत मेमरी वाढवता येऊ शकते. - वाय-फाय, जीपीएस, ब्ल्यूटूथ यासारखे फीचर - बॅटरी 3120 mAh क्षमता
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत























