एक्स्प्लोर
शाओमीचे रेडमी 4, 4A, आणि 4 प्राइम स्मार्टफोन लॉन्च
बीजिंग: बीजिंगमध्ये शाओमीनं एका इव्हेंटमध्ये आपला नवा स्मार्टफोन रेडमी 4 लाँच केला आहे. यासोबतच कंपनीनं रेडमी 4A आणि रेडमी 4 प्राइम देखील लाँच करण्यात आला. रेडमी 4ची किंमत 699 युआन (जवळजवळ 6,900 रु.), रेडमी 4 प्राइमची किंमत 899 युआन (जवळजवळ 8,900 रु.) आणि रेडमी 4Aची किंमत 499 युआन (जवळजवळ 4,900 रु.) आहे.
रेडमी 4 आणि रेडमी 4 प्राइमच्या प्री ऑर्डर सुरु झाल्या आहेत. या स्मार्टफोनची विक्री येत्या सोमवारपासून सुरु होणार असून तर रेडमी 4Aची विक्री 11 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे.
रेडमी 4 आणि रेडमी 4 प्राइममध्ये मेटल यूनिबॉडी, 2.5D कर्व्ह्ड ग्लास देण्यात आलं आहे. तर दोन्ही स्मार्टफोनमध्ये ड्यूल सिम सपोर्ट असून रिअर पॅनल फिंगरप्रिंट सेन्सरही आहे.
रेडमी 4 मध्ये 5 इंच स्क्रिन आहे. तर याचं रेझ्युलेशन 720X1280 पिक्सल आहे. यामध्ये 1.4GHz ऑक्टा कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 430 प्रोसेसर आहे. तसंच 2 जीबी रॅमही आहे. या स्मार्टफोनची खासियत म्हणजे याच कॅमेरा. या स्मार्टफोनमध्ये ड्यूल एलईडी फ्लॅशसोबत 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
रेडमी 4 मध्ये 16 जीबी इंटरनल मेमर असून 1128 जीबीपर्यंत मेमरी वाढवता येऊ शकते. यामध्ये 4जी, LTE , वाय-फाय, ब्ल्यूटूथ आणि जीपीएस कनेक्टिव्हिटी ऑप्शन आहेत. याची बॅटरी 4100mAh आहे.
दुसरीकडे रेडमी 4 प्राइममध्ये 4 इंच डिस्प्ले असून याचं रेझ्युलेशन 1080X1920 पिक्सल आहे. यामध्ये 2Ghz ऑक्टाकोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 625 चिपसेट आहे. यासोबत यात 3 जीबी रॅम असून यात 32 जीबी इंटरनल मेमरी देखील आहे.
लाँच झालेल्य रेडमीचा स्वस्त स्मार्टफोन 4Aमध्ये ड्यूल सिम सपोर्ट असून 5 इंच स्क्रीन आहे. या स्मार्टफोनचं रेझ्युलेशन 720x 1280 पिक्सल आहे. 1.4GHz क्वॉड कोअर स्नॅपड्रॅगन 425 सोबत 2 जीबी रॅम आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा असून 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
सोलापूर
Advertisement