एक्स्प्लोर
चेहरा पाहून अनलॉक होणारा MI Mix 2 लाँच
या फोनची किंमत 35 हजार रुपये ठेवण्यात आली असून फ्लिपकार्ट आणि Mi.com वर हा फोन नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात खरेदी करता येईल.
नवी दिल्ली : शाओमीने भारतात MI Mix 2 हा फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीचा या वर्षातील हा पहिलाच फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे. या फोनची किंमत 35 हजार रुपये ठेवण्यात आली असून फ्लिपकार्ट आणि Mi.com वर हा फोन नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात खरेदी करता येईल.
MI Mix 2 भारतात 6GB रॅम आणि 128GB इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या फोनचे इतर दोन व्हेरिएंट कधी लाँच करण्यात येतील, याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
चीनमध्ये हा फोन रॅम आणि स्टोरेज आधारावर वेगवेगळ्या तीन व्हेरिएंटवर लाँच करण्यात आला आहे. 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 3299 युआन (जवळपास 32 हजार 300 रुपये), 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 3599 युआन (जवळपास 35 हजार 300 रुपये), तर 6GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 3999 युआन (जवळपास 39 हजार 200 रुपये) एवढी आहे.
MI Mix 2 चे फीचर्स
- 5.99 इंच आकाराची क्वाडएचडी स्क्रीन
- 6GB रॅम आणि 128GB इंटर्नल स्टोरेज
- स्नॅपड्रॅगन 835 प्रोसेसर
- 12 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा (सोनी आयएमएक्स 386 सेंसर)
- ऑप्टिकल इमेज स्टेबिलायझेशन
- 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा (फेशियल रिकॉग्निशन)
- 3400mAh क्षमतेची बॅटरी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement