एक्स्प्लोर
Advertisement
World Television Day : का आणि कधीपासून साजरा केला जातो 'वर्ल्ड टेलिविजन डे'?
टेलिव्हिजन किंवा टिव्ही... आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग. दिवसभराचा थकवा आणि कामाचा ताण यातून थोडं रिलॅक्स होण्यासाठी हाच टिव्ही आपल्याला मदत करतो.
मुंबई : टेलिव्हिजन हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आज आपण टिव्हीवर जे कार्यक्रम पाहतो ते एकेकाळी ब्लॅक अॅन्ड व्हाइट असायचे. त्यानंतर तंत्रज्ञान युगात झालेल्या बदलांमुळे टिव्हीमध्येही अनेक बदल झालेले पाहायला मिळतात. आधी एखाद्या डब्ब्याप्रमाणे दिसणारा हा टिव्ही आता अगदी स्लिम-ट्रिम झाला आहे. कदाचित येणाऱ्या काळात टिव्ही हे अत्यंत महत्त्वाचं माध्यम होणार याची जाणीव लोकांना 1996 मध्येच झाली होती. कारण त्याच वर्षी 21 नोव्हेंबर पासून 'वर्ल्ड टेलिविजन डे' साजरा केला जात आहे.
कशी झाली सुरुवात?
1996मध्ये संयुक्त राष्ट्राकडून पहिली वर्ल्ड टेलिव्हिजन फोरम बोलावण्यात आली होती. यामध्ये जगभरातील टिव्ही इंडस्ट्रीतील प्रमुख लोक सहभागी झाले होते. सर्वांनी वैश्विक राजनिती आणि डिसिजन मेकिंगमध्ये टेलिव्हिजनच्या सहभागाविषयी चर्चा केली. यावेळी सर्वांनी असा निष्कर्ष काढला की, समाजात दिवसागणिक टिव्हीचं महत्त्व वाढत आहे. यानंतर संयुक्त राष्ट्राच्या जनरल असेंबलीने 21 नोव्हेंबर रोजी 'वर्ल्ड टेलिविजन डे' घोषित करण्यात आला. हा निर्णय वैश्विक सहकार्य वाढविण्यासाठी टेलिव्हिजनचं योगदान वाढविण्यासाठी घेण्यात आला होता.
व्हॉट्सअॅपच्या नको असलेल्या ग्रुपपासून सुटका हवी?; 'या' सेटिंग्स करा
दरम्यान, जर्मनीतील डेलिगेशनने या निर्णयाचा विरोधही केला होता. त्यांचं असं म्हणणं होतं की, याच प्रकारचे तीन दिवस साजरे केले जात आहेत. त्यामध्ये 'वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे', 'वर्ल्ड टेलिकम्यूनिकेशन डे' आणि 'वर्ल्ड डेव्हलपमेंट इन्फॉर्मेशन डे' यांसारख्या दिवसांचा समावेश होता. अशातच आणखी एका दिवसाची घोषणा करणं ठिक नाही. दरम्यान, त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यात आलं पण मान्य केलं गेलं नाही. तेव्हापासून दरवर्षी 21 नोव्हेंबर रोजी 'वर्ल्ड टेलिविजन डे' साजरा करण्यात येतो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
कोल्हापूर
निवडणूक
निवडणूक
Advertisement