एक्स्प्लोर

Ola Electric | ओलाच्या 'या' प्लांटमध्ये महिलांकडे पूर्ण जबाबदारी; 10 हजार महिला कामगारांची भरती होणार

Ola Electric : उत्पादन क्षेत्रात महिलांचा वाटा 12 टक्के असल्याचे कंपनीने म्हटले आहे. महिलांना आर्थिक संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांना सक्षम करणे केवळ त्यांचे जीवन बदलणार नाही तर समाज सुधारेल.

काही काळापासून ऑटो मार्केटमध्ये धुमाकूळ घालणारी ओला इलेक्ट्रिक (Ola Electric) आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने कंपनी तमिळनाडूच्या प्लांटमध्ये 10 हजार महिलांना नोकऱ्या देणार आहे. एवढेच नाही तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इथे सर्व जबाबदारी फक्त महिलांची असेल. कंपनीचे सह-संस्थापक भाविश अग्रवाल यांच्या मते, महिला या प्लांटचे संचालन करतील.

10 हजार महिलांना नोकऱ्या मिळतील
ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल म्हणाले की, स्वावलंबी भारताला आत्मनिर्भर स्त्रीची गरज आहे. पूर्णपणे महिला चालवत असलेला हा जगातील एकमेव मोटार वाहन निर्मिती प्रकल्प असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यामध्ये सुमारे 10 हजार महिलांना नोकऱ्या मिळणार आहे. ते म्हणाले की, महिलांना आर्थिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी अधिक समावेशक कार्यबल तयार करण्याच्या दिशेने हे आमचे पहिले पाऊल आहे. कंपनीच्या वतीने सांगण्यात आले की कंपनीने या महिलांचे मुख्य उत्पादन कौशल्य सुधारण्यासाठी भरपूर गुंतवणूक केली आहे. प्लांटमध्ये बनवलेल्या प्रत्येक वाहनासाठी महिला जबाबदार असतील.

'कर्मचाऱ्यांमध्ये महिलांचा सहभाग आवश्यक'
भाविश अग्रवाल म्हणाले की, केवळ महिलांनाच कार्यक्षेत्रात समान संधी मिळाल्याने देशाच्या GDP मध्ये 27 टक्के वाढ होऊ शकते. ते म्हणाले की, उत्पादनात महिलांचा वाटा सर्वात कमी 12 टक्के आहे. महिलांना आर्थिक संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांना सक्षम करणे केवळ त्यांचे जीवन बदलणार नाही तर त्यांचे कुटुंब आणि समाज सुधारेल. भारताला जगातील उत्पादन केंद्र बनवण्यासाठी आपण महिलांना कामात समाविष्ट केले पाहिजे आणि त्यांचे कौशल्य वाढवले ​​पाहिजे यावरही त्यांनी भर दिला.

10 लाखांच्या क्षमतेने उत्पादन होणार
2020 मध्ये ओलाने तामिळनाडूतील आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक स्कूटर प्लांटवर 2,400 कोटींच्या गुंतवणुकीची घोषणा केली होती. कंपनीने सांगितले की सुरुवातीला 10 लाख प्रतिवर्षाच्या क्षमतेने उत्पादन सुरू केले जाईल. त्याचबरोबर बाजाराच्या मागणीनुसार त्यात वाढ केली जाईल.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

साठवण तलाव मंजूर करा, ग्रामस्थ आक्रमक, बीडच्या केज तहसीलसमोर ग्रामस्थांनी पेटवली बैलगाडी
साठवण तलाव मंजूर करा, ग्रामस्थ आक्रमक, बीडच्या केज तहसीलसमोर ग्रामस्थांनी पेटवली बैलगाडी
Navi Mumbai International Airport: ऐनवेळी महायुती सरकारकडून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटलांचं नाव; पीएम मोदी, सीएम फडणवीसांकडून भूमिपुत्राच्या संघर्षाचं स्मरण
ऐनवेळी महायुती सरकारकडून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटलांचं नाव; पीएम मोदी, सीएम फडणवीसांकडून भूमिपुत्राच्या संघर्षाचं स्मरण
रोहित शर्माची नवी कोरी टेस्ला कार, फ्रंट सीटवर बसून मारली राईड; गाडीचा नंबर खास; काय आहे मागील स्टोरी?
रोहित शर्माची नवी कोरी टेस्ला कार, फ्रंट सीटवर बसून मारली राईड; गाडीचा नंबर खास; काय आहे मागील स्टोरी?
राज्यातील समर्थ सहकारी बँकेला RBI चा दणका, ठेवीदारांमध्ये संताप; बँकेचे अध्यक्ष समोर आले, नेमकं काय म्हणाले?
राज्यातील समर्थ सहकारी बँकेला RBI चा दणका, ठेवीदारांमध्ये संताप; बँकेचे अध्यक्ष समोर आले, नेमकं काय म्हणाले?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Heavy Rain | पुणे शहरात मुसळधार पाऊस, Shivaji Nagar, Swargate, Katraj, Kothrud मध्ये जोरदार
Navi Mumbai Airport Inauguration | केंद्रीय मंत्री K R Naidu यांचे मराठीत भाषण, मुंबईला 'अमूल्य भेट'
NMIA Inauguration | नवी मुंबई विमानतळ उद्घाटन, 'Third Mumbai' ची घोषणा!
PM Modi On Congress : काही लोक घोटाळे करून विकासात अडथळे निर्माण करतात, काँग्रेसवर टीका
Navi Mumbai Airport Inauguration | PM Modi च्या भाषणातून गुंतवणुकीवर भर, 160 हून अधिक Airports

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
साठवण तलाव मंजूर करा, ग्रामस्थ आक्रमक, बीडच्या केज तहसीलसमोर ग्रामस्थांनी पेटवली बैलगाडी
साठवण तलाव मंजूर करा, ग्रामस्थ आक्रमक, बीडच्या केज तहसीलसमोर ग्रामस्थांनी पेटवली बैलगाडी
Navi Mumbai International Airport: ऐनवेळी महायुती सरकारकडून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटलांचं नाव; पीएम मोदी, सीएम फडणवीसांकडून भूमिपुत्राच्या संघर्षाचं स्मरण
ऐनवेळी महायुती सरकारकडून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटलांचं नाव; पीएम मोदी, सीएम फडणवीसांकडून भूमिपुत्राच्या संघर्षाचं स्मरण
रोहित शर्माची नवी कोरी टेस्ला कार, फ्रंट सीटवर बसून मारली राईड; गाडीचा नंबर खास; काय आहे मागील स्टोरी?
रोहित शर्माची नवी कोरी टेस्ला कार, फ्रंट सीटवर बसून मारली राईड; गाडीचा नंबर खास; काय आहे मागील स्टोरी?
राज्यातील समर्थ सहकारी बँकेला RBI चा दणका, ठेवीदारांमध्ये संताप; बँकेचे अध्यक्ष समोर आले, नेमकं काय म्हणाले?
राज्यातील समर्थ सहकारी बँकेला RBI चा दणका, ठेवीदारांमध्ये संताप; बँकेचे अध्यक्ष समोर आले, नेमकं काय म्हणाले?
हवाई चप्पल घालणाऱ्याने हवाई सफर करावा हे माझं स्वप्न, नवी मुंबई विमानतळ लोकार्पणातून मोदींचं भाष्य, काँग्रेससह उद्धव ठाकरेंवरही निशाणा
हवाई चप्पल घालणाऱ्याने हवाई सफर करावा हे माझं स्वप्न, नवी मुंबई विमानतळ लोकार्पणातून मोदींचं भाष्य, काँग्रेससह उद्धव ठाकरेंवरही निशाणा
Eknath Shinde on PM Modi: मोदीजी हात लावतात तिथं सोनं होतं, मोदी है तो मुमकिन है; विमानतळ उद्घाटनात एकनाथ शिंदेंकडून कौतुकाचा वर्षाव, ठाकरेंवर हल्लाबोल
मोदीजी हात लावतात तिथं सोनं होतं, मोदी है तो मुमकिन है; विमानतळ उद्घाटनात एकनाथ शिंदेंकडून कौतुकाचा वर्षाव, ठाकरेंवर हल्लाबोल
Jhund actor died: मोठी बातमी : नागराज मंजुळेच्या सिनेमात काम केलेल्या तरुणाची हत्या, दारुसाठी मित्रानेच घात केला
मोठी बातमी : नागराज मंजुळेच्या सिनेमात काम केलेल्या तरुणाची हत्या, दारुसाठी मित्रानेच घात केला
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत जोकर, दलबदलूसारखा आरोप झालेले प्रशांत किशोर किंगमेकर ठरणार? राजकीय तज्ज्ञांचा नेमका अंदाज काय?
बिहार निवडणुकीत जोकर, दलबदलूसारखा आरोप झालेले प्रशांत किशोर किंगमेकर ठरणार? राजकीय तज्ज्ञांचा नेमका अंदाज काय?
Embed widget