एक्स्प्लोर
'डिजिटल इंडिया'ला वादळ, शार्क आणि जहाजांचा धोका
नवी दिल्ली : चेन्नईतील वरदा वादळाने देशातील अनेक भागांमध्ये इंटरनेट स्पीड मंदावलं आहे. मात्र चेन्नईमध्ये वादळ असून आपलं इंटरनेट का मंदावलं, असा प्रश्न सर्वांच्या मनात येणं स्वाभाविक आहे.
'बीबीसी'च्या एका रिपोर्टनुसार समुद्राखालून टाकलेल्या केबलवर इंटरनेटचं विश्व अवलंबून आहे. आणि चेन्नई हे देशातील महत्वाच्या स्थानापैकी एक आहे. त्यामुळे वरदाचा तडाखा देशभरातील अनेक भागातील इंटरनेट युझर्सना बसू शकतो.
आयडिया, व्होडाफोन अशा काही प्रमुख कंपन्यांनी ग्राहकांना इंटरनेट स्पीड मंदावू शकतं, याबाबत अगोदरच मेसेजद्वारे कल्पना दिली आहे.
वादळामुळे तुमचं इंटरनेट का मंदावलं?
वादळ आणि इंटरनेटचा काय संबंध, हा प्रश्न सध्या अनेक इंटरनेट युझर्ससमोर उभा राहिला आहे. मात्र समुद्राखालून असलेल्या केबलवर इंटरनेट विश्व अवलंबून असल्याने वादळाचा फटका इंटरनेटलाही बसतो.
टेलिकम्युनिकेशन मार्केट कंपनी टेलिजिओग्राफीच्या रिपोर्टनुसार जगात सध्या समुद्राखालून 321 केबल सिस्टीम कार्यरत आहेत. यापैकी काही सिस्टीम तयार होत आहेत, तर काही सिस्टीम कार्यरत आहेत.
आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे 2006 साली समुद्राखालून केवळ एक टक्के केबल लाईन होती. तर आता जगभरातील 99 टक्के सिस्टीम समुद्राखालील केबलवर आधारित आहे.
समुद्राखालील केबलला कशाचा धोका?
वरदा हे इंटरनेट स्पीड मंदावल्याचं केवळ ताजं उदाहरण आहे. मात्र यापूर्वी शार्क, जहाज यांमुळे देखील इंटरनेटचा वेग मंदावला आहे. हा धोका असूनही समुद्राखालील केबल सिस्टीम सॅटेलाईटच्या वापरापेक्षा अत्यंत स्वस्त आहे.
जगभरात कार्यरत असलेल्या इंटरनेट केबलला बॅकअप म्हणून सिस्टीम तयार करण्याचंही अनेक ठिकाणी काम सुरु आहे. कारण जपानमध्ये त्सुनामी आल्यानंतर केबलला मोठ्या प्रमाणात हानी पोहचली होती. मात्र जपानमध्ये अगोदरच बॅकअप असल्याने इंटरनेटवर फारसा परिणाम झाला नाही.
चेन्नई आणि मुंबई केबल लँडिंगचे प्रमुख केंद्र
सबमरिन केबल नेटवर्कनुसार देशात 10 ठिकाणी महत्वाचे केबल लँडिंग स्टेशन आहेत. यामध्ये चार स्टेशन मुंबई, तीन चेन्नई, एक कोची, एक तुतीकोरिन आणि एक दिघा या ठिकाणी आहेत.
केबल लँडिंग स्टेशनमध्ये मुंबई आणि चेन्नई ही दोन केंद्र अत्यंत महत्वाची मानली जातात. चेन्नईतील समुद्रामध्ये फायबर ऑप्टीक्सचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे दक्षिण भारतात इंटरनेचा वेग मंदावला आहे.
मुंबईचं इंटरनेट 'युरोपा इंडिया गेटवे'शी जोडलेलं आहे. ज्याची लांबी जवळपास 15 हजार किमीपेक्षा अधिक आहे.
दरम्यान चेन्नईमधील इंटरनेटचा वेग आणखी काही दिवस मंदावलेलाच राहण्याची शक्यता आहे. कारण दूरसंचार कंपन्यांच्या माहितीनुसार समुद्राखालील केबलला झालेल्या नुकसानीची दुरस्ती सुरु असल्यामुळे हायस्पीड इंटरनेटसाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement