एक्स्प्लोर
'या' स्मार्टफोन्सवर लवकरच व्हॉट्सअॅप बंद होणार!
31 डिसेंबर 2018 नंतर म्हणजेच नव्या वर्षात व्हॉट्सअॅप वापरायचं असेल, तर कंपनीने लिस्ट केलेले फोन तुम्हाला बदलावे लागतील.
मुंबई : या वर्षअखेर काही स्मार्टफोन्सवर तुम्हाला व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही. आऊटडेटेज व्हर्जनला 2019 पासून व्हॉट्सअॅप सपोर्ट करणार नाही. 31 डिसेंबर 2018 नंतर म्हणजेच नव्या वर्षात व्हॉट्सअॅप वापरायचं असेल, तर कंपनीने लिस्ट केलेले फोन तुम्हाला बदलावे लागतील.
व्हॉट्सअॅप नव्याने जी फीचर्स आणणार आहे, त्यांना जुन्या व्हर्जन्सवर सपोर्ट मिळणार नाही. तुम्ही जुनं अँड्रॉईड व्हर्जन वापरत असाल, तर ते अद्ययावत करुन घेण्याचा सल्ला व्हॉट्सअॅपने दिला आहे.
व्हॉट्सअॅप नवनवीन यूझर्सना आकर्षित करण्यासाठी सातत्याने नवनवीन फिचर्स आणत असते. मात्र काही आधुनिक फिचर्स देताना जुन्या व्हर्जनसोबत तडजोड करणं शक्य नसल्याने, असे कठोर निर्णय घ्यावे लागत असल्याचं व्हॉट्सअॅपतर्फे सांगण्यात येत आहे.
या फोनवर व्हॉट्सअॅप चालणार नाही
नोकिया S40 (31 डिसेंबर 2018 नंतर चालणार नाही)
अँड्रॉईड 2.3.7 आणि यापेक्षा जुने व्हर्जन्स (1 फेब्रुवारी 2020 नंतर चालणार नाही)
आयफोन iOS 7 आणि यापेक्षा जुने व्हर्जन्स (1 फेब्रुवारी 2020 नंतर चालणार नाही)
या फोनवर व्हॉट्सअॅप चालत नाही
अँड्रॉईड 2.3.3 आणि यापेक्षा जुने व्हर्जन्स
विंडोज फोन 8.0 आणि यापेक्षा जुने व्हर्जन्स
आयफोन 3GS/iOS 6
नोकिया सिम्बियन S60
ब्लॅकबेरी ओएस आणि ब्लॅकबेरी 10
31 डिसेंबरनंतर या मोबाईलवर व्हॉट्सअॅप बंद होणार!
या व्हर्जनला अपग्रेड करा
अँड्रॉईड 4.0 किंवा त्यापुढे
आयफोन iOS 8 किंवा त्यापुढे
विंडोज 8.1 किंवा त्यापुढे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement