एक्स्प्लोर

अफवा रोखण्यासाठी व्हॉट्सअॅप आणणार नवं फीचर

व्हॉट्सअॅपने आयटी विभाग आणि गृह विभागासोबत विश्वासात राहून अशा अफवा रोखण्यासाठी काम करावे, असं अावाहनही रविशंकर प्रसाद यांनी व्हॉट्सअॅपला केले.

नवी दिल्ली : केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी नोटीस पाठवल्यानंतर आता व्हॉट्सअॅपने अफवा रोखण्यासाठी नवं फीचर आणण्याचं आश्वासन दिलं आहे. सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवांमुळे देशभरात अनेक ठिकाणी हिंसा झाली आहे. “व्हॉट्सअॅपला आम्ही एक नोटीस पाठवली आहे. व्हॉट्सअॅपवरुन पसरणाऱ्या अफवांमुळे मागील काही दिवसांत जमावाकडून होणाऱ्या हत्यांच्या अनेक घटना घडल्या आहेत. मुलं पळवण्याच्या अफवेवरुन सर्वाधिक लोकांचे बळी गेले. यामुळे व्हॉट्सअॅपला आता सावध आणि जबाबदार व्हावं लागेल,” असं वक्तव्य रविशंकर प्रसाद यांनी केलं आहे. व्हॉट्सअॅपने आयटी विभाग आणि गृह विभागासोबत विश्वासात राहून अशा अफवा रोखण्यासाठी काम करावे, असं आवाहनही रविशंकर प्रसाद यांनी व्हॉट्सअपला केले. व्हॉट्सअॅपची प्रतिक्रिया “व्हॉट्सअॅप लोकांची सुरक्षा आणि संवादाची काळजी घेत असून आम्हाला असं वाटत नाही की ही सेवा घातक आहे. कोणीही या सेवेचा वापर चुकीच्या पद्धतीने करु नये. या अफवा रोखता येतील, अशी व्यवस्था कंपनी लवकरच आणेल.” असं व्हॉट्सअॅपच्या प्रवक्त्याने म्हटलं  आहे. अफवांमुळे 31 बळी अफवांमुळे जमावाकडून हत्या होण्याचं लोण आता देशभर पसरलं आहे. देशातील 10 राज्यांत एकूण 31 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. महाराष्ट्रातील धुळे जिल्हात अलिकडेच मुलं पळवल्याच्या संशयावरुन जमावाने पाच जणांचा बळी घेतला होता. व्हॉट्सअॅपद्वारे खोटी माहिती पसरवून लोकांना चुकीच्या सूचना दिल्या जात आहेत. यामुळेच केंद्र सरकाने व्हॉट्सअॅपला हे रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचा आदेश दिला होता.

महत्त्वाच्या बातम्या

AI Virus: चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
Tech-Neck Problem Health News: मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
Instagram Ban In India Fact Check: मोदी सरकार 25 ऑगस्टपासून इन्स्टाग्राम बंद करणार? व्हायरल पोस्टने खळबळ, सरकारची मोठी अपडेट
मोदी सरकार 25 ऑगस्टपासून इन्स्टाग्राम बंद करणार? व्हायरल पोस्टने खळबळ, सरकारची मोठी अपडेट

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget