एक्स्प्लोर

Instagram Ban In India Fact Check: मोदी सरकार 25 ऑगस्टपासून इन्स्टाग्राम बंद करणार? व्हायरल पोस्टने खळबळ, सरकारची मोठी अपडेट

सोशल मीडियावर 25 ऑगस्ट 2026 च्या रात्रीपासून भारतात इन्स्टाग्रामवर बंदी घालण्यात येणार असल्याचा दावा केला जात आहे.

Instagram Ban In India Fact Check: सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, 25 ऑगस्ट 2026 पासून भारतात इन्स्टाग्रामवर बंदी घालण्यात येणार असल्याचा दावा केला जातोय. (Instagram Ban Viral Post) या दाव्यामुळे अनेक नेटकऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. मात्र, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) च्या फॅक्ट चेक युनिटने हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचं स्पष्ट केलं आहे.

PIB ने काय सांगितलं?

PIB फॅक्ट चेकने सोशल मीडियावरील व्हायरल पोस्टचा खुलासा करत म्हटलं आहे की, भारत सरकारने 25 ऑगस्टपासून इन्स्टाग्रामवर बंदी घालण्याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. त्यामुळे अशा दिशाभूल करणाऱ्या पोस्टवर विश्वास ठेवू नये किंवा त्या पुढे शेअर करू नयेत, असं आवाहन करण्यात आलं आहे. PIBने आपल्या अधिकृत सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे, "सोशल मीडियावर 25 ऑगस्ट 2026 च्या रात्रीपासून भारतात इन्स्टाग्रामवर बंदी घालण्यात येणार असल्याचा दावा केला जात आहे. हा दावा पूर्णपणे खोटा आहे. भारत सरकारने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही."

सोशल मीडियावर चर्चेला उधाण

ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी इन्स्टाग्रामवरील फोटो, व्हिडीओ आणि इतर डेटा बॅकअप करून ठेवण्याचा सल्ला देणारे संदेशही शेअर केले. त्यामुळे अनेक युजर्समध्ये संभ्रम निर्माण झाला. मात्र, Meta, केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय किंवा इतर कोणत्याही सरकारी संस्थेकडून इन्स्टाग्रामवर बंदीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

अधिकृत स्रोतांवरच विश्वास ठेवण्याचं आवाहन

सध्या भारतात इन्स्टाग्रामची सेवा सुरळीत सुरू असून, 25 ऑगस्टपासून बंदी लागू होणार असल्याच्या दाव्यात कोणतंही तथ्य नाही. केंद्र सरकारच्या निर्णयांबाबत किंवा धोरणांबाबत सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टवर आंधळेपणाने विश्वास न ठेवता, PIB Fact Check किंवा संबंधित सरकारी अधिकृत स्रोतांवरूनच माहितीची खात्री करून घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.तसंच, केंद्र सरकारशी संबंधित संशयास्पद संदेश, व्हिडीओ किंवा फोटो आढळल्यास ते PIB Fact Check कडे पडताळणीसाठी पाठवावेत, असंही नागरिकांना सांगण्यात आलं आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
Advertisement

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Embed widget