एक्स्प्लोर
फेसबुक, व्हॉट्सअॅपवर केंद्र सरकारकडून निर्बंध येण्याची शक्यता
नवी दिल्ली: तुमच्या रोजच्या वापरात असलेल्या व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवर केंद्र सरकार लवकरच बंधनं घालण्याची शक्यता आहे. कारण काल सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीत केंद्रानं ही माहिती दिली आहे.
देशभरातल्या टेलिकॉम कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी असलेल्या ट्राय या संस्थेप्रमाणेच सोशल मीडियाची सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यासाठीही एक यंत्रणा असावी, असा कल केंद्र सरकारचा आहे. यामध्ये व्हॉट्सअॅप, फेसबुक, स्काईप, वी-चॅट आणि गुगल टॉकसारख्या सेवांचा समावेश आहे.
या सर्व माध्यमातून होणाऱ्या संवादावर आणि त्याच्या डेटाचा उपयोग या कंपन्या कमर्शियल वापरासाठी करत होत्या. त्यावर निर्बंध घालण्यासाठी एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्याच याचिकेच्या सुनावणीदरम्यान कोर्टानं सरकारचं मत मागवलं होतं.
कोर्टाच्या या प्रश्नाला उत्तर देताना सरकारनं या कंपन्यांच्या सेवांवर नियंत्रण ठेवण्याचे संकेत दिले. अर्थात हे निर्बंध कोणत्या प्रकारचे असतील हे अद्याप स्पष्ट नाही. दरम्यान, आता या प्रकरणाची सुनावणी 18 एप्रिलला होणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement