Whats App : भारतातील 14 लाखांहून अधिक युजर्सचे Whats App अकाउंट बंद
WhatsApp : फेब्रुवारी महिन्यात व्हाट्स अॅपने भारतीयांची 14 लाख अकाउंट्स बंद केलीत.

Whats App Ban Accounts : तुम्ही WhatsApp वापरत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. WhatsApp ने फेब्रुवारी 2022 मध्ये दाखल झालेल्या तक्रारींच्या आधारे जवळपास 14.26 लाख भारतीयांचे व्हाट्स अॅप अकाउंट बंद केले आहेत.
कंपनीने सांगितले की, ही कारवाई त्यांच्या तक्रार विभागामार्फत युजर्सकडून आलेल्या तक्रारींच्या आधारे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना रोखण्यासाठी करण्यात आली आहे.
194 खाते बंद करण्याचे आवाहन
1 ते 28 फेब्रुवारी दरम्यान व्हॉट्सअॅपला 335 भारतीय खात्यांविरोधात तक्रारी प्राप्त झाल्या, त्यापैकी 194 खाती बंद करण्याचे आवाहन करण्यात आले आणि त्यातील 21 खात्यांवर कारवाई करण्यात आली. अहवालानुसार, फेब्रुवारीमध्ये 14.26 लाख भारतीय खात्यांवर व्हॉट्सअॅपने बंदी घातली.
जानेवारी महिन्यात कंपनीने 18.58 लाख भारतीय व्हॉट्सअॅप अकाऊंट्सवर बंदी घातली होती. जानेवारी महिन्यात ४९५ भारतीय खात्यांविरोधात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
आमच्या प्लॅटफॉर्मवर आमच्या वापरकर्त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि इतर अत्याधुनिक तंत्रज्ञान, डेटा वैज्ञानिक आणि तज्ञ आणि प्रक्रियांमध्ये सातत्याने गुंतवणूक सुरू असल्याचे कंपनीने म्हटले.
व्हाट्स अॅपवर 2 जीबीपर्यंतची फाइल शेअर करता येणार
व्हॉट्सअॅपमध्ये (WhatsApp) नविन फिचर्स नेहमी अॅड होत असतात. व्हॉट्सअॅप अपडेट केल्यानंतर तुम्ही या फिचर्सचा वापर करू शकता. रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅप या मेसेजिंग अॅपची कंपनी ही लवकरच एक फिचर लाँच करण्याची शक्यता आहे. हे नवे फिचर अँड्रोइड आणि iOS या दोघांसाठी देखील उपलब्ध असेल. सध्या या फिचरचा वापर अर्जेंटिनामधील काही युजर बीटा चाचणीसाठी करत आहेत.
युजर 2GB पर्यंत साइज असणारी फाइल करू शकणार शेअर
सोशल मीडिया अॅपचा वापर करून अनेक जण फाइल्स शेअर करतात. पण व्हॉट्सअॅप आणि जीमेल या अॅप्सचा वापर करून फाइल्स शेअर करताना फाइल्सच्या साइजची मर्यादा आहे. जीमेलमधून फाइल शेअर करताना ती फाइल 25MB पेक्षा जास्त नसावी, याची काळजी घ्यावी लागते. तर सध्या व्हॉट्अॅपवरून तुम्ही 100MB साइज पर्यंतची फाइल सेंड करू शकता. अशा वेळी अनेक लोक टेलिग्रामचा वापर करतात. कारण टेलिग्राम या अॅपला फाइल साइजची मर्यादा नाही. पण आता व्हाॉट्अॅपच्या या नव्या फिचरचा वापर करून तुम्ही 2GB पर्यंतची फाइल शेअर करू शकणार आहात.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
