Airtel Google : एअरटेलचा धमाका; भारतात स्वस्त स्मार्टफोन तयार करणार, गुगलची मोठी गुंतवणूक
Airtel Google : एअरटेलमध्ये गुगल मोठी गुंतवणूक करणार आहे. येत्या पाच वर्षात 100 कोटी डॉलरची गुंतवणूक करणार आहे.
Google invest in Airtel : भारतीय टेलिकॉम कंपनी एअरटेलमध्ये गुगल मोठी गुंतवणूक करणार आहे. दोन्ही कंपन्यांनी भारतात डिजिटल इकोसिस्टीम (Digital Ecosystem)अधिक वेगवान करण्यासाठी करार केला आहे. या करारानुसार गुगल एअरटेलमध्ये एक अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे. या गुंतवणुकीतून एअरटेल भारतात स्वस्त दरातील स्मार्टफोन आणि अन्य डिजिटल डिव्हाइसची निर्मिती करणार आहे.
पाच वर्षात होणार गुंतवणूक
दोन्ही कंपन्यांनी संयुक्तपणे शुक्रवारी याबाबतची माहिती दिली. गुगल आपल्या India Digitization Fund च्या माध्यमातून ही गुंतवणूक करणार आहे. ही गुंतवणूक पुढील पाच वर्षात होणार आहे. या गुंतवणुकीच्या मदतीने लोकांसाठी स्वस्त दरातील स्मार्टफोन आणि अन्य अॅण्ड्रॉईड डिव्हाइस उपलब्ध करण्यात येणार आहे. त्याशिवाय 5 जी आणि अन्य अत्याधुनिक तंत्रज्ञान लक्षात घेऊन भारतासाठी खास नेटवर्क डोमेन तयार करण्यासाठी या गुंतवणुकीचा वापर करण्यात येणार आहे.
एअरटेलच्या शेअरमध्ये गुगलचा पैसा
गुगल 700 दशलक्ष डॉलर हे भारती एअरटेलमध्ये इक्विटी शेअरच्या माध्यमातून गुंतवणार आहे. भारती एअरटेलचे शेअर 734 रुपये प्रती शेअर या दराने गुंतवण्यात येणार आहे. त्याशिवाय 300 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक ही व्यावसायिक कराराची अंमलबजावणी करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. यामुळे एअरटेल अधिकाधिक ग्राहकांना जोडणार असून आपली सेवा अधिक चांगली करता येणार आहे.
भारतात डिजिटलकरणाला गती मिळावी
भारती एअरटेलचे अध्यक्ष सुनील भारती मित्तल यांनी सांगितले की, दोन्ही कंपन्यांना भारतात डिजिटलकरणाला गती द्यायची आहे. भारतीय डिजिटल इकोसिस्टमचा विस्तार करण्यासाठी गुगलसोबत काम करण्यास आम्ही तयार आहोत. गुगलचे सीईओ सुंदर पिच्चई यांनी सांगितले की, भारताचे डिजिटल भविष्य तयार करणाऱ्यांमध्ये एअरटेल ही प्रमुख कंपनी आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Youtube Shorts मधून दर महिन्याला मिळणार 7.5 लाख रुपये कमावण्याची संधी, या पद्धती फॉलो करा...
- लवकरच जिओची 5G सेवा 1000 शहरांमध्ये सुरू होणार, भारतासह अमेरिकेत 5G सोल्यूशन टीम तैनात
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha