एक्स्प्लोर
व्होडाफोनचा 346 रुपयात दररोज 1 जीबी 4G डेटा
मुंबई : जिओला टक्कर देण्यासाठी व्होडाफोनने जबरदस्त प्लॅन लॉन्च केला आहे. प्रत्येक महिन्याला 346 रुपयांच्या रिचार्जमध्ये दररोज 1 GB या प्रमाणे महिन्याला 28 जीबी 3G/4G डेटा मिळणार आहे. मात्र, हा प्लॅन व्होडाफोनच्या प्रीपेड ग्राहकांसाठी आहे.
‘जिओ प्राईम’नुसार दर महिन्याला 303 रुपयांचा रिचार्ज केल्यास, अनलिमिटेड कॉल, एसएमएस आणि दररोज 1 जीबी 3G/4G डेटा मिळणार आहे. जिओच्या प्लॅनला टक्कर देण्यासाठी व्होडाफोनने 346 रुपयांचा जबरदस्त प्लॅन बाजारात आणला आहे.
जिओचा प्लॅन हा त्यांच्या प्राईम ग्राहकांसाठीच असेल, तर व्होडाफोनने अशी कोणतीही अट ठेवली नाही. व्होडाफोनच्या सर्व प्रीपेड ग्राहकांसाठी या प्लॅनचा लाभ घेता येणार आहे.
व्होडाफोन नवा प्लॅन काय आहे?
व्होडाफोनच्या प्रीपेड ग्राहकांना प्रत्येक महिन्याला 346 रुपयांचा रिचार्ज करावा लागणार आहे. यामध्ये दररोज 1 जीबी 3G आणि 4G डेटा या प्रमाणे 28 GB 4G डेटा मिळणार आहे. त्याचसोबत अनलिमिटेड फ्री कॉल करता येणार आहेत.
रिलायन्स जिओच्या प्राईम मेंबरशिप आणि एप्रिलपासून सुरु होणाऱ्या नव्या ऑफर्समुळे इतर प्रस्थापित टेलिकॉम कंपन्यांमध्ये नव-नव्या ऑफर्सवरुन स्पर्धा सुरु झाली आहे. खरंतर इतर कंपन्यांना जिओचा चांगलाच धसका घेतला आहे. एअरटेलपाठोपाठ आता व्होडाफोननेही इंटरनेट डेटा आणि व्हॉईस कॉल्सचा प्लॅन लॉन्च करत जिओलाच टक्कर दिली आहे.
व्होडाफोनच्या नव्या प्रीपेड ग्राहकांसाठीच्या प्लॅनला कसा प्रतिसाद मिळतो आणि जिओला टक्कर देण्यात व्होडाफोनला यश मिळतंय का, हे येत्या काळात दिसून येईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement