एक्स्प्लोर
Advertisement
व्हायरल सत्य: जिओसारखं एअरटेल फ्री डेटा देणार?
मुंबई: रिलायन्स जिओमुळे सध्या अनेक दूरसंचार कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. एअरटेल आणि वोडाफोनला याचा चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे अनेक नवनवीन ऑफर आणून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न या कंपन्यांकडून सुरु आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर मात्र, गेल्या काही दिवसांपासून एक मेसेज सध्या व्हायरल होत आहे. 'तीन महिन्यासाठी एअरटेलचा 4जी 3जी डेटा फ्री मिळणार. तुमच्या प्लान अॅक्टिव्हेट करण्यासाठी खालील लिकंवर क्लिक करा.' असा मेसेज व्हायरल होत असल्यानं एअरटेलच्या ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.
व्हायरल होणारा हा मेसेज मात्र खरा नसल्याचं उघड झालं आहे. सर्वात आधी या मेसेजमधील भाषा ही अतिशय चुकीच्या पद्धतीचं आहे. एअरटेलच्या सर्व ऑफरचे ग्राहकांना मेसेज पाठवले जातात. तसेच त्यांच्या अधिकृत एअरटेल पेजची लिंक पाठवली जाते. पण व्हायरल मेसेजमध्ये दुसरीच लिंक पाठवली आहे.
या लिंकवर क्लिक केल्यास एक पेज सुरु होतं. ज्यामध्ये तुमची सगळी माहिती विचारली जाते. ती माहिती भरल्यानंतर तुम्हाला मेसेज येतो की, हा मेसेज 8 जणांना फॉरवर्ड करा. त्यामुळे हा मेसेज खोटा असल्याचं स्पष्ट होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement