एक्स्प्लोर
व्हिडिओकॉनचा नवा स्मार्टफोन लाँच, किंमत 5800 रु.
मुंबई: भारतीय मोबाईल कंपनी व्हिडिओकॉननं आपला नवा स्मार्टफोन डिलाइट 11 प्लस लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमत अवघी 5,800 रुपये आहे. या महिन्याच्या शेवटी देशभरात हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.
डिलाइट 11 प्लस स्मार्टफोनमध्ये 5 इंच डिस्प्ले असणार आहे. स्मार्टफोनमध्ये 1 गीगाहर्त्झ क्वॉड कोअर मीडियाटेक MT6735 प्रोसेसरसोबत 1 जीबी रॅम देण्यात आलं आहे.
या स्मार्टफोनमध्ये 5 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि तर 2 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये फ्लॅश लाईटही देण्यात आलं आहे. या स्मार्टफोनमध्ये प्रो 360 ओएस असून अँड्रॉईड 6.0 मार्शमेलो ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे.
व्हिडिओकॉनचे तंत्रज्ञान प्रमुख अक्षय धूत यांनी याबाबत बोलताना सांगितलं की, 'ज्यांना चांगला 4जी स्मार्टफोन खरेदी करायचा आहे तेडिलाइट 11 प्लस हा ग्राहकांसाठी चांगला पर्याय आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement