Twitter Update : ट्विटरने आपला 'स्पेस' वाढवला, 600 फॉलोअर्सची मर्यादा हटवली
Twitter Spaces : गेल्या वर्षी सुरु iOS, अॅन्ड्रॉइड यूजर्ससाठी ट्विटरने स्पेसची सुरुवात केली होती. त्यावेळी 600 पेक्षा जास्त फॉलोअर्स असणाऱ्या यूजर्सना स्पेस होस्ट करण्याची परवानगी देण्यात आली होती.
Twitter Update : ट्विटरने (Twitter)आपल्या लाईव्ह ऑडिओ चॅट रुम म्हणजे स्पेस (Spaces) वर होस्ट करण्यासाठी 600 फॉलोअर्सच्या संख्येची मर्यादा शिथिल केली आहे. गेल्या वर्षी सुरु iOS आणि अॅन्ड्रॉइड यूजर्ससाठी ट्विटरने स्पेसची सुरुवात केली होती. त्यावेळी ज्या यूजर्सला 600 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत त्यांनाच स्पेस होस्ट करण्याची परवानगी देण्यात आली होती. परंतु आता ही मर्यादा हटवण्यात आली आहे.
ट्विटरने आपल्या फीचर्स आणि उपयोगितेत वाढ करण्यासाठी त्यांच्या धोरणात बदल करण्याचं ठरवलं आहे. या वर्षीच्या जून महिन्यात ट्विटरने आपल्या डेडिकेटेड टॅबची सुविधा उपलब्ध करुन देऊन आपल्या स्पेस सर्चच्या सुविधेला अधिक सुलभ बनवलं होतं. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात स्पेसला को-होस्ट करण्यासाठी ऑप्शन उपलब्ध करुन दिला होता.
नव्या स्पेसचा वापर करण्यासाठी केवळ ट्विटच्या बटनावर टॅप करायचं आहे आणि त्यानंतर स्पेस या ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला स्पेसला नाव द्यावं लागेल आणि मेन्यूतील तीन टॉपिक्सना सिलेक्ट करावं लागेल. "Start Your Space" या बटनाच्या समोरच्या कॅलेंडर आयकॉनवर टॅप करुन एक डेट आणि टाईम सिलेक्ट करुन आपण स्पेस शेड्यूल करु शकतो.
स्पेसवर लाईव्ह आल्यानंतर आपण दोन इतर लोकांना को होस्टच्या स्वरुपात इन्व्हाईट करु शकता. मॅनेजमेन्ट टॅबचा वापर करुन या चर्चेला मॉडरेट केलं जावू शकतं. यामध्ये ऐकणारे प्रेक्षक हे इमोजीचा वापर करुन या चर्चेत सामिल होऊ शकतात, रिअॅक्टही करु शकतात. रिक्वेस्ट बटनाचा वापर करुन ते या चर्चेत आपलं मत मांडण्यासाठी परवानगी मागू शकतात. आपण तीन पॉईन्टवाल्या आयकॉनला प्रेस करुन त्यांनंतर मेन्यू सिलेक्ट करुन कॅप्शनचा वापर करु शकता.
संबंधित बातम्या :