(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Twitter Down : जगभरातील अनेक भागात ट्विटर डाऊन, नेटकरी हैराण
Twitter Down : जगभरातील अनेक भागात सध्या ट्विटर डाऊन झालं आहे. त्यामुळं नेटकरी हैराण झाले आहेत.
Twitter Down : जगभरातील अनेक भागात सध्या ट्विटर डाऊन झालं आहे. त्यामुळं नेटकरी हैराण झाले आहेत. युजर्सना Twitter वापरताना अनेक अडचणी येत आहेत. DownDetector (सर्व वेबसाइट्सबाबतची अपडेट देणारी साइट) ने याबाबतची माहिती दिली आहे. काही लोकांना ट्वीटर वापरण्यास काहीच अडचण येत नाही तर काही लोकांना ट्वीटरचा वापर करताना अडचणी येत आहेत.
भारतावर फारसा प्रभाव नाही
DownDetector या साईटने दिलेल्या माहितीनुसास ट्विटर आउटेज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास सुरु झाले. सकाळी 7 च्या सुमारास ही समस्या आणखी वाढल्याचे दिसून आले. दरम्यान, DownDetector च्या मते, ट्विटर डाऊन झाल्यामुळं भारतातील फार कमी भाग प्रभावित झाला आहेत. ट्विटर डाऊनचा जास्त परिणाम भारतात झाला नसल्याचे म्हटलं आहे. टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क (Elon Musk) यांनी अखेर व्टीटरचा ताबा घेतला आहे. त्यानंतर ट्विटर गेल्या एका आठवड्यापासून सतत चर्चेत आहे.
ब्लू टिकसाठी पैसे द्यावे लागतील
सध्या संपूर्ण जगभरात ट्विटरची चर्चा आहे. आता ट्विटरची मालकी एलॉन मस्क यांच्याकडे गेली आहे. मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यापासूनच बदलांच्या नांदीचे संकेत दिले होते. त्यानुसार, लवकरच ट्विटरमध्ये अनेक बदल घडणार आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे, ट्विटर युजर व्हेरिफिकेशन प्रक्रियेत बदल होणार आहे. एलॉन मस्क (Elon Musk) यांनी यासंदर्भात माहिती दिली होती. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "संपूर्ण व्हेरिफिकेशन प्रक्रिया सध्या सुधारित केली जात आहे." मात्र, या संदर्भात त्यांनी अद्याप सविस्तर माहिती दिलेली नाही. रॉयटर्स वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, ट्विटर युजर्सचं (Platformer) खातं व्हेरिफाइड करण्यासाठी आणि ब्लू टिक देण्यासाठी शुल्क आकारण्याचा विचार करत आहे. अहवालानुसार, ट्विटर वापरकर्त्यांना ब्लू टिक टिकवून ठेवण्यासाठी म्हणजेच, त्यांचं अकाउंट व्हेरिफाईड करण्यासाठी सुमारे 661 रुपये प्रति महिना भरावे लागण्याची शक्यता आहे. तसेच ट्विटरने (Twitter) आता 'एडिट ट्विट' फिचर ( Edit Tweet Button ) लाँच केलं आहे. ट्विटर एडिट बटणाचा ( Tweer Edit Feature ) पर्याय सध्या फक्त ठराविक युजर्सना उपलब्ध करून देण्यात आला आहे. या ट्विटरच्या नव्या फिचरमुळे तुम्हाला तुम्ही ट्वीट केलेलं ट्वीट एडिट ( Edit ) म्हणजे दुरुस्त करता येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या: