एक्स्प्लोर

Twitter Vs Musk : ट्विटर विरूद्ध मस्क वाद! कोर्टाचा ट्विटरला मोठा झटका, एलॉन मस्कना 'ही' माहिती देण्याचे आदेश

Twitter Vs Musk : आता ट्विटर आणि एलॉन मस्क यांच्यात सुरू असलेल्या वादात, न्यायालयाने ट्विटरला गेल्या वर्षी सर्वेक्षण केलेल्या 9,000 खात्यांचे तपशील शेअर करण्याचे आदेश दिले आहेत.

Twitter Vs Musk : ट्विटर (Twitter) आणि एलॉन मस्क (Elon Musk) यांच्यात सुरू असलेल्या वादात मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरला कोर्टाकडून झटका मिळाला आहे. नुकतेच टेस्लाचे सीईओ एलॉन मस्कने ट्विटरच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. आता ट्विटर आणि एलॉन मस्क यांच्यात सुरू असलेल्या वादात, न्यायालयाने ट्विटरला गेल्या वर्षी सर्वेक्षण केलेल्या 9,000 खात्यांचे तपशील शेअर करण्याचे आदेश दिले आहेत.

ट्विटरवरील बॉट अकाउंटवरून वाद

एलॉन मस्कने एप्रिल 2022 मध्ये ट्विटर विकत घेण्यासाठी 44 बिलियन डॉलर (सुमारे 3.4 लाख कोटी रुपये) ऑफर केले होते. मात्र, ट्विटरवरील बॉट अकाउंटवरून वाद निर्माण झाल्यानंतर मस्कने हा करार रद्द केला.

मस्कने 44 अब्ज डॉलरचा ट्विटर करार रद्द केला

एलॉन मस्क यांनी न्यायालयाला सांगितले की, सोशल मीडिया कंपनीने त्यांना प्लॅटफॉर्मवरील बॉट्स म्हणजेच बनावट खात्यांबद्दल चुकीची माहिती दिली आहे. मस्कसोबत करार करताना ट्विटरने सांगितले की, प्लॅटफॉर्मवर फक्त 5 टक्के बॉट खाती आहेत. त्याच वेळी, जेव्हा मस्कने ट्विटरला बॉट अकाऊंट तपासण्यासाठी तपशील मागितला, तेव्हा अमेरिकन सोशल मीडिया कंपनी ट्विटरने नकार दिला, त्यानंतर ट्विटर आणि मस्कमध्ये वाद सुरू झाला आणि मस्कने करार रद्द केला.

बॉट खात्यांचे तपशील शेअर करण्याचा आदेश
न्यायालयाने बॉट खात्यांचे तपशील शेअर करण्याबाबत आदेश जारी केला आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, मस्कच्या अपीलवर, कंपनीने या खात्यांची माहिती मस्कला शेअर करावी. डेलावेअर चॅन्सरी न्यायालयाचे न्यायाधीश कॅथलीन सेंट जे. मॅककॉर्मिक यांनी ट्विटरला हा आदेश जारी केला.

ट्विटरवरही खटला

ट्विटरने एलॉन मस्क यांच्यावर करार रद्द केल्याबद्दल खटला दाखल केला आहे. सोशल मीडिया कंपनीने सांगितले की, करार रद्द केल्यामुळे मस्कला सुमारे 7,900 कोटी रुपये टर्मिनेशन फी भरावी लागेल. ट्विटर आणि एलॉन मस्क यांच्यातील करार रद्द झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध खटले दाखल केले आहेत. ट्विटर विकत घेण्यासाठी मस्कने US $ 54.20 (सुमारे 4,300 रुपये) प्रति शेअरची ऑफर दिली. या संदर्भात, सोशल मीडिया कंपनीचे एकूण शेअर मूल्य $ 44 अब्ज (सुमारे 3.4 लाख कोटी रुपये) आहे.

Bot म्हणजे काय? 
बॉट म्हणजे एक स्वयंचलित संगणक प्रोग्राम आहे. संगणकाच्या भाषेत 'बॉट'ला एक स्वयंचलित संगणक प्रोग्राम असे म्हणतात. मानवाला जे काम एकाच वेळी की जास्त क्षमतेने करता येत नाही ते काम बॉट एकाच वेळेस किंवा वारंवार करू शकतो. Bot चा फुल फॉर्म 'Build Operate Transfer' असा होतो. बॉटचे वेगवेगळे प्रकार आहेत. जसे की, Internet Bot, Chat Bot, Social Bot, Video Game Bot असे अनेक बॉटचे प्रकार आहेत. यांना इंटरनेट रोबोट, स्पाइडर्स, क्रॉलर, वेब बॉट अश्या नावांनी सुद्धा सुद्धा ओळखले जाते. आज इंटरनेटवर सगळीकडे बॉट्स असतात. काही बॉट्स उपयोगी असतात. जसे की गूगल सर्च इंजिन वर बॉट्स दर सेकंदाला किंवा मिनिटाला पोस्ट होणारे वेब पेजेस, कंटेंट, व्हिडिओज, माहिती इंडेक्स (index) करतात. त्यानंतर ते स्वतःच ते रॅंक करतात.

इतर महत्वाच्या बातम्या

Elon Musk news: 'माझं ट्विटर अकाऊंट इलॉन मस्क चालवतो'; पुण्यातील इंजिनिअरच्या व्हायरल ट्विटवर इलॉन मस्कचा रिप्लाय

Pune paranay pathole elon musk Meet:पोरानं करुन दाखवलं! पुण्यातील प्रणय पाटोळे इलॉन मस्क यांना भेटायला थेट पोहचला अमेरिकेत; ट्विटरवर झाली होती दोघांची दोस्ती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Omprakash Rajenimbalkar : ओमराजे निंबाळकरांचा उमेदवारी अर्ज बाद होण्याची भीती अन् आता स्वत:च दिली महत्त्वाची माहिती!
ओमराजे निंबाळकरांचा उमेदवारी अर्ज बाद होण्याची भीती अन् आता स्वत:च दिली महत्त्वाची माहिती!
MS Dhoni कडून चेंडू गिफ्ट मिळालेल्या चिमुकलीने सर्वांचं हृदय जिंकलं; 'माही'ला एक वचनही दिलं!
MS Dhoni कडून चेंडू गिफ्ट मिळालेल्या चिमुकलीने सर्वांचं हृदय जिंकलं; 'माही'ला एक वचनही दिलं!
Bollywood Most Popular Actress : देशातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री कोण? तीन खान अन् अक्षयकुमारही जवळपास नाही!
देशातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री कोण? तीन खान अन् अक्षयकुमारही जवळपास नाही!
Jayant Patil : शरद पवारांची राष्ट्रवादी लोकसभेला किती जागा जिंकणार? जयंत पाटलांनी आकडा सांगितला!
शरद पवारांची राष्ट्रवादी लोकसभेला किती जागा जिंकणार? जयंत पाटलांनी आकडा सांगितला!
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 20 April 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 1 PM  :20 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNarendra Modi Nanded Full Speech : जशी अमेठी सोडली, तसं राहुल गांधींना वायनाड सोडावं लागेल- मोदीSanjay Raut on Vishal Patil : विशाल पाटील समजूतदार आहे ; आमच्यात उत्तम संवाद - संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Omprakash Rajenimbalkar : ओमराजे निंबाळकरांचा उमेदवारी अर्ज बाद होण्याची भीती अन् आता स्वत:च दिली महत्त्वाची माहिती!
ओमराजे निंबाळकरांचा उमेदवारी अर्ज बाद होण्याची भीती अन् आता स्वत:च दिली महत्त्वाची माहिती!
MS Dhoni कडून चेंडू गिफ्ट मिळालेल्या चिमुकलीने सर्वांचं हृदय जिंकलं; 'माही'ला एक वचनही दिलं!
MS Dhoni कडून चेंडू गिफ्ट मिळालेल्या चिमुकलीने सर्वांचं हृदय जिंकलं; 'माही'ला एक वचनही दिलं!
Bollywood Most Popular Actress : देशातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री कोण? तीन खान अन् अक्षयकुमारही जवळपास नाही!
देशातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री कोण? तीन खान अन् अक्षयकुमारही जवळपास नाही!
Jayant Patil : शरद पवारांची राष्ट्रवादी लोकसभेला किती जागा जिंकणार? जयंत पाटलांनी आकडा सांगितला!
शरद पवारांची राष्ट्रवादी लोकसभेला किती जागा जिंकणार? जयंत पाटलांनी आकडा सांगितला!
Dhule Loksabha : धुळे लोकसभेच्या उमेदवारीवरून काँग्रेसमधील नाराजीनाट्य कायम; मेळाव्यांकडे पाठ फिरवल्याचे चित्र
धुळे लोकसभेच्या उमेदवारीवरून काँग्रेसमधील नाराजीनाट्य कायम; कार्यकर्त्यांची मेळाव्यांकडे पाठ
''इंडी आघाडीवाले 4 जूननंतर एकमेकांचे कपडे फाडतील, केसं ओढतील''; पंतप्रधान मोदींना 'गॅरंटी'
''इंडी आघाडीवाले 4 जूननंतर एकमेकांचे कपडे फाडतील, केसं ओढतील''; पंतप्रधान मोदींना 'गॅरंटी'
Sanjay Raut : उद्धव ठाकरे इंडिया आघाडीत पीएम का असू शकत नाहीत? शरद पवारांचाही पाठिंबा मिळेल; संजय राऊतांचा दावा
'उद्धव ठाकरे इंडिया आघाडीत पीएम का असू शकत नाहीत? शरद पवारांचाही पाठिंबा मिळेल'
'हे काही शहाणपणाचे लक्षण नाही...'; शरद पवारांचा विखे-पाटलांना टोला, अमित शहांनाही प्रत्युत्तर
'हे काही शहाणपणाचे लक्षण नाही...'; शरद पवारांचा विखे-पाटलांना टोला, अमित शहांनाही प्रत्युत्तर
Embed widget