एक्स्प्लोर

आता केवळ 3 दिवसात मोबाईल नंबर होणार पोर्ट

आता केवळ 3 दिवसांत मोबाईल नंबर पोर्ट करता येणार आहे, या संदर्भात ट्रायने नवीन नियमावली जारी केली आहे. सुधारित नियमानुसार जर ऑपरेटरने पोर्टिंग अर्ज नाकारला तर त्यासाठी दंडाचीही तरतूद करण्यात आली आहे.

मुंबई : आता मोबाईल नंबर पोर्ट करणे अधिक सोपं होणार आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने(TRAI)मोबाईल नंबर पोर्टिबिलिटीसाठी नवीन नियमावली सादर केली आहे. यानुसार, आता केवळ 3 दिवसांच्या आत ग्राहक नंबर पोर्ट करु शकणार आहेत. तर एका सर्कलवरुन दुसऱ्या सर्कलमध्ये नंबर पोर्ट करायचा असल्यास 5 दिवसांचा अवधी लागणार आहे. मोबाईल नंबर पोर्टिबिलिटीचे हे नवीन नियम 16 डिसेंबरपासून लागू होतील. नंबर पोर्ट करण्याची सुविधा उपलब्ध झाल्यापासून अनेकांनी या सुविधेचा लाभ घेतला. मात्र, नंबर पोर्ट करण्याची ही प्रक्रिया वाटती तितकी सोपी नाही. अनेकवेळा कारण नसताना मोबाईल कंपन्या ग्राहकांना नंबर पोर्ट करु देत नाहीत. याच संदर्भात ग्राहकांच्या अनेक तक्रारी येत होत्या. याच पार्श्वभूमीवर ट्रायने हा निर्णय घेतला आहे. कंपनीने अर्ज नाकारल्यास 10 हजारांचा दंड - सुधारित नियमानुसार जर ऑपरेटरने चुकून पोर्टिंग अर्ज नाकारला तर त्याला 10,000 रुपये दंड आकारला जाणार आहे. नवीन सुधारित नियमांनुसार सर्वात मोठा बदल यूनिक पोर्टिंग कोड (यूपीसी)शी संबंधित आहे. त्यानुसार आता टेलिकॉम ऑपरेटरला यूपीसीचा अर्ज मिळेल आणि तो त्वरित संबंधित एमएनपीएसपीकडे पाठविला जाईल. एमएनपीएसपी, डोनर ऑपरेटरच्या डेटाबेसद्वारे तपासणी करुन यूपीसी जनरेट करेल आणि नंतर तो ग्राहकांना पाठवेल. त्यामुळं ही प्रक्रिया केवळ 3 दिवसांच्या आत पूर्ण होणार आहे. सध्या नंबर पोर्ट करण्यासाठी 7 दिवसांचा वेळ लागतो. मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी म्हणजे काय? मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी ही एक सुविधा आहे ज्यात ग्राहकांचा नंबर न बदलता ऑपरेटर बदलण्याचा पर्याय आहे. यासाठी युजरला पोर्टिंग कोड जनरेट करावा लागतो. हा यूनिक कोडच त्यांना नंबर पोर्ट करण्यास मदत करतो. नवीन नियमांनुसार, टेलिकॉम ऑपरेटर्सला प्रत्येक ट्रांजेक्शनसाठी 5.74 रुपये द्यावे लागतील. सध्या कंपन्यांना प्रत्येक ग्राहकांसाठी एजेंसीनी 19 रुपये द्यावे लागतात. सुधारित नियमांतर्गत मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी सर्व्हिस (एमएनपीएसपी)ग्राहकांच्या सुविधेसाठी अनोखा पोर्टिंग कोड तयार करावा लागणार आहे. तर पूर्वी हा नियम दूरसंचार ऑपरेटरला लागू होता. युनिक पोर्टिंग कोड (यूपीसी)हा आठ अंकी अल्फा संख्यात्मक कोड आहे. मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये ट्रायने हा सुधारित नियम लागू केला होता. जो जून 2019 मध्येच लागू होणार होता. मात्र, मोबाईल कंपन्यांनी या नियमांना न्यायालयात आव्हान दिल्याने हा निर्णय लांबणीवर पडला होता. संबंधित बातम्या - 5 मिनिटांत मिळवा 1 लाखांपर्यंतचे कर्ज; शाओमी कंपनीची ऑफर आयडिया-व्होडोफोनच्या ग्राहकांना बसणार झटका; 3 डिसेंबरपासून नवीन दरवाढ मोबाईल कंपन्यांच्या दरवाढीबाबत ग्राहकांना काय वाटतं? | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

boAt Aavante Bar Prime Soniq-D Review: 240W डॉल्बी ऑडिओ, इक्विकोर ड्राइव्हर्ससह 2.1-चॅनेल साउंडबार, boAt Aavante Bar Prime SoniQ-D ची खास वैशिष्ट्य, वाचा सविस्तर
240W डॉल्बी ऑडिओ, इक्विकोर ड्राइव्हर्ससह 2.1-चॅनेल साउंडबार; boAt Aavante Bar Prime SoniQ-D ची खास वैशिष्ट्य, वाचा सविस्तर
AI Application: ना कोडिंगचं ज्ञान, ना एआयचं प्रशिक्षण..; 13 वर्षीय मुलीची भन्नाट कामगिरी, एआय ॲपची जगात चर्चा; तीन दिवसात कमावले 2.2 लाख
ना कोडिंगचं ज्ञान, ना एआयचं प्रशिक्षण..; 13 वर्षीय मुलीची भन्नाट कामगिरी, एआय ॲपची जगात चर्चा; तीन दिवसात कमावले 2.2 लाख
Best Soundbars: 'एन्ट्री-लेव्हल' मॉडेल्सपासून ते डॉल्बी ॲटमॉस, वायरलेस सॅटेलाइट स्पीकर्सपर्यंत...; विविध बजेट्ससाठी boAt Aavante Bar चे सहा दर्जेदार पर्याय
'एन्ट्री-लेव्हल' मॉडेल्सपासून ते डॉल्बी ॲटमॉस, वायरलेस सॅटेलाइट स्पीकर्सपर्यंत...; विविध बजेट्ससाठी boAt Aavante Bar चे सहा दर्जेदार पर्याय
Best Party Speakers: कराओके, RGB लाइट्स आणि वायरलेस माईक्ससह 'boAt'चे चार सर्वोत्तम पार्टी स्पीकर्स; किंमतसह वाचा सर्व डिटेल्स
कराओके, RGB लाइट्स आणि वायरलेस माईक्ससह 'boAt'चे चार सर्वोत्तम पार्टी स्पीकर्स; किंमतसह वाचा सर्व डिटेल्स

व्हिडीओ

Pradeep Purnekar Case : ठाकरेंच्या सैनिकावर फैरी पूर्णेकरांचे कोण वैरी? Special Report
India Alliance on EC : ज्ञानेश कुमारांना घेरलं इंडिया आघाडीचं ठरलं | Special Report ABP Majha
Thackeray Congress on EC : आयोगाविरोधात थोपटले दंड, विरोधकांची तयारी प्रचंड | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case : टॅटू, चॅटिंग, मर्डर; आरोपांचा डोंगर | Special Report ABP Majha
Raj Thackeray Rahul Gandhi : राज-राहुल संपर्क? चर्चेत राऊतांचा तर्क Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ambernath Crime : अंबरनाथमध्ये नाट्यगृहात पालिकेची सभा, बाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये शस्त्र सापडली,वेगवेगळ्या नंबरप्लेटमुळं खळबळ
अंबरनाथमध्ये नाट्यगृहात पालिकेची सभा बाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये शस्त्र सापडली,वेगवेगळ्या नंबरप्लेटमुळं खळबळ
'लालबागचा राजा'चरणी सोन्याची वीट अर्पण, मौल्यवान वस्तूंचा आज होतोय लिलाव; बाजारभावानुसार किंमत किती?
'लालबागचा राजा'चरणी सोन्याची वीट अर्पण, मौल्यवान वस्तूंचा आज होतोय लिलाव; बाजारभावानुसार किंमत किती?
मुंबईतील BMC अधिकाऱ्यांनी 3.50 लाखांची लाच मागितली; एसीबीने सापळा रचला, आरोपींच्या घराचीही झाडाडती
मुंबईतील BMC अधिकाऱ्यांनी 3.50 लाखांची लाच मागितली; एसीबीने सापळा रचला, आरोपींच्या घराचीही झाडाडती
Aadhaar Card :  मोठी बातमी, दस्त नोंदणीसाठी आधार कार्ड अनिवार्य, 1 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू, चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय   
दस्त नोंदणीसाठी आधार कार्ड अनिवार्य, 1 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू, चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय
अखेर 71 वर्षीय माजी खासदाराविरुद्ध गुन्हा दाखल; एर्टिगा कारने दुचाकीला उडवलं, पती ठार, पत्नी जखमी
अखेर 71 वर्षीय माजी खासदाराविरुद्ध गुन्हा दाखल; एर्टिगा कारने दुचाकीला उडवलं, पती ठार, पत्नी जखमी
Video: प्रदीप पूर्णेकरांच्या हत्याप्रकरणात संजय राऊतांनी ठाण्यात जाऊन ठणकावलं; दोघांचं नाव घ्यावंच लागेल, कुणालाही सोडायचं नाही
Video: प्रदीप पूर्णेकरांच्या हत्याप्रकरणात संजय राऊतांनी ठाण्यात जाऊन ठणकावलं; दोघांचं नाव घ्यावंच लागेल, कुणालाही सोडायचं नाही
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 सप्टेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 सप्टेंबर 2026 | बुधवार
Share Market : सप्टेंबरच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्ससह निफ्टी घसरणीसह बंद, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले
शेअर बाजारात घसरण सुरुच, सेन्सेक्ससह निफ्टी घसरणीसह बंद, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले
Embed widget