एक्स्प्लोर
फेसबूकचं नवं अॅप, जिथं फक्त 22 वर्षाखालील मुलांनाच एन्ट्री!
मुंबई: सध्या सोशल मीडियावरील फेसबूक हे सर्वात लोकप्रिय माध्यम आहे. विविध वयोगटातील कोट्यवधी लोक फेसबूकच्यामधून एकमेकांशी कनेक्ट आहेत. मात्र, आता फेसबुकने एक असे नवे अॅप लाँच केले असून, तिथे फक्त 22 वर्षाखालील मुलांनाच एन्ट्री असणार आहे.
फेसबुकने हे नवे अॅप गेल्याच आठवड्यात अमेरिकेत लाँच केले असून त्याला मिळणाऱ्या प्रतिसादानुसार इतर देशांमध्येही लाँच करण्यात येणार आहे.
या नव्या अॅपचे नाव लाईफस्टेज असे असून, या अॅपवर फक्त 22 वर्षांखालील मुलांनाच चॅट करण्याची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे, या नव्या अॅपवर लॉगइन करण्यासाठी 22 वर्षाखालील तरुण-तरुणींवर फेसबुकवर अकाउंट असण्याची गरज नाही. या अॅपवर इतर वयोगटातील तरुण-तरुणींना केवळ स्वत:ची प्रोफाईल पाहता येणार आहे.
फेसबूकचे हे नवे अॅप मायकल सेमेन या 19 वर्षीय मुलाने तयार केले आहे. फेसबुकच्या लॉचिंगवेळी तो दुसरीत शिकत होता. गेल्या दोन वर्षांपासून तो फेसबूकसाठी काम करत असून सोशल नेटवर्कला वाढवण्याचे विविध प्रकाराचे शिक्षण घेत आहे.
फेसबूकने यापूर्वी आपली सोशल नेटवर्किंग साईट 2004 साली अशाच प्रकारे तरुण-तरुणींध्ये लाँच केले होते. त्यानंतर त्याची लोकप्रियता वाढल्याने ते सर्वांसाठी खुले करण्यात आले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement