108MP Camera Phones : 108 मेगापिक्सल कॅमेरा असलेले स्मार्टफोन्स; किंमत 25 हजारांहून कमी
भारतीय बाजारात उपलब्ध असलेल्या त्या 108MP स्मार्टफोन बद्दल आज माहिती जाणून घेऊया ज्यांची किंमत 25,000 रुपयांपेक्षा कमी आहे.
108MP Camera Phones : काही दिवसांपर्यंत 108 मेगापिक्सल कॅमेरा फक्त महागड्या प्रीमियम सेगमेंट स्मार्टफोनमध्ये उपलब्ध होता. यावर्षी ही परिस्थिती बदलली आहे आणि अनेक स्मार्टफोन कंपन्यांनी असे 108MP स्मार्टफोन बाजारात आणले आहेत, ज्यांचे बजेट जास्त नाही. भारतीय बाजारात उपलब्ध असलेल्या त्या 108MP स्मार्टफोन बद्दल आज माहिती जाणून घेऊया ज्यांची किंमत 25,000 रुपयांपेक्षा कमी आहे.
रेडमी नोट 10 प्रो मॅक्स (Redmi Note 10 Pro Max)
Redmi Note 10 Pro Max स्मार्टफोनमध्ये 108MP क्वॉड रियर कॅमेरा सेटअप आहे. फोनच्या समोर सेल्फीसाठी 20 एमपी कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये 6.6 इंच सुपर AMOLED FHD + डिस्प्ले आहे. या फोनमध्ये क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 732 जी चिपसेट आणि अँड्रॉइड 11 बेस्ड MIUI 12 चा सपोर्ट मिळतो. स्मार्टफोनमध्ये 5020mAh बॅटरी देण्यात आली असून ही बॅटरी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या फोनची किंमत 21,100 रुपये आहे.
Mi 10i
Mi 10i या स्मार्टफोनमध्ये 6.67-इंच डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 750G प्रोसेसर आहे. या फोनमध्ये 4820 mAh ची बॅटरी आहे. स्मार्टफोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये 108 एमपी सॅमसंग एचएम 2 सेन्सर, 8 एमपी अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, 2 एमपी मायक्रो लेन्स आणि 2 एमपी डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. फोनच्या फ्रंटवर 16 मेगापिक्स कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनची किंमत 22,950 रुपये आहे.
रीअलमी 8 प्रो (Realme 8 Pro)
Realme 8 Pro या स्मार्टफोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप आहे. या स्मार्टफोनची मेन लेन्स 108MP आहे. यात 8MP सह दोन 2MP सेन्सर आहेत. फोनच्या समोरच्या बाजूने 16 एमपी कॅमेरा उपलब्ध आहे. स्मार्टफोनमध्ये 6.4-इंच फुल एचडी प्लस AMOLED डिस्प्ले आहे. फोनमध्ये 4500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. यात स्नॅपड्रॅगन 720G प्रोसेसर आहे. या फोनची किंमत 17,999 रुपये आहे.
मोटो जी 60 (Moto G 60)
Moto G 60 फोनमध्ये 108 एमपी मेन सेन्सर, 8 एमपी अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 एमपी डेप्थ सेन्सर आहे. फोनच्या समोरच्या बाजूने 32 एमपी कॅमेरा उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.8-इंचाचा FHD+ डिस्प्ले 120Hz च्या रिफ्रेश रेटसह आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाले तर यात 6000mAh ची बॅटरी आहे जी 20W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या फोनची किंमत 18,099 रुपये आहे.