एक्स्प्लोर

युद्धातून मैत्रीकडे? इराणसोबत काम करण्याची तयारी, निर्बंध सैल होण्याचे संकेत, ट्रम्प यांचा मोठा दावा

Iran US Conflict: अमेरिका-इराण युद्धबंदी जाहीर होताच ट्रम्प यांनी मोठा दावा केला. इराणसोबत सहकार्य, युरेनियम कार्यक्रमावर नियंत्रण आणि निर्बंधांमध्ये सवलत यावर चर्चा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

Iran US Conflict : अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावपूर्ण युद्धानंतर आता परिस्थिती बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. दोन आठवड्यांच्या युद्धविरामानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी मोठा दावा करत दोन्ही देश आता एकत्र काम करण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं सांगितलं आहे.

US Iran Relations : सहकार्याच्या दिशेने पावले

डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले की, इराणमध्ये सत्ताबदलाची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता दोन्ही देशांमध्ये सहकार्याची नवी सुरुवात होऊ शकते. त्यांनी दावा केला की, इराणकडून युरेनियम संवर्धन थांबवले जाईल आणि अमेरिकेसोबत मिळून भूमिगत अणुसामग्री बाहेर काढण्याचे काम केलं जाईल.

यासोबतच संपूर्ण परिसरावर सॅटेलाइटद्वारे कडक नजर ठेवण्यात येत असल्याचेही डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले. हल्ल्यानंतर संबंधित अणुस्थळांमध्ये कोणतीही छेडछाड झालेली नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

Sanctions Relief Talks : निर्बंध आणि टॅरिफ सवलतीवर चर्चा

ट्रम्प यांनी संकेत दिले की, अमेरिका आणि इराण यांच्यात टॅरिफ आणि आर्थिक निर्बंध सैल करण्याबाबत चर्चा सुरू आहे. 15 मुद्द्यांपैकी अनेक मुद्द्यांवर सहमती झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. यामुळे भविष्यात इराणवरील आर्थिक दबाव कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

China Role In Middle East : चीनची मध्यस्थी महत्त्वाची

दरम्यान, चीननेही या घडामोडींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचं समोर आलं आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मोओ निंग (Mao Ning) यांनी पश्चिम आशियामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी चीन सक्रिय असल्याचे सांगितलं. चीन सातत्याने युद्धविराम आणि चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याचा प्रयत्न करत असून खाडी प्रदेशात स्थिरता निर्माण करण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.

Ceasefire Impact : युद्धविरामानंतरची नवी समीकरणे

सुमारे 40 दिवस चाललेल्या संघर्षानंतर जाहीर झालेला युद्धविराम हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या सीजफायरमुळे होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली होण्याची शक्यता आहे, ज्याचा थेट परिणाम जागतिक ऊर्जा बाजारावर होऊ शकतो. 

तज्ज्ञांच्या मते, युद्धानंतर अचानक सहकार्याची भाषा सुरू होणे हे आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठं वळण ठरू शकतं. मात्र, हा करार किती टिकाऊ ठरेल, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Pakistan News: पाकिस्तानात मोठी दुर्घटना! कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला अन् होत्याचं नव्हतं झालं; 32 कामगारांचा मृत्यू
पाकिस्तानात मोठी दुर्घटना! कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला अन् होत्याचं नव्हतं झालं; 32 कामगारांचा मृत्यू
Israel-Hamas Gaza War: मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार
मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार, डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती
Nepal Violence: कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Maharashtra Live blog updates: महायुतीचे सरकार 2047 पर्यंत काम करणार: चंद्रशेखर बावनकुळे
Maharashtra Live blog updates: महायुतीचे सरकार 2047 पर्यंत काम करणार: चंद्रशेखर बावनकुळे
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
Maharashtra Rain updates: मोठी बातमी: हवामान खात्याकडून ऑगस्टमधील पावसाबाबत महत्त्वाची अपडेट, विदर्भ आणि मराठवाड्याची चिंता मिटणार?
मोठी बातमी: हवामान खात्याकडून ऑगस्टमधील पावसाबाबत महत्त्वाची अपडेट, विदर्भ आणि मराठवाड्याची चिंता मिटणार?
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
Embed widget