एक्स्प्लोर
Advertisement
सिंधू देशाची मान उंचावत असताना, देशवासीय तिची जात शोधत होते!
मुंबई : आपण पुरोगामी असल्याचा कितीही आव आणला, तरी खरं रुप कधीच लपत नाही, हेच खरं. आता याचा पुन्हा प्रत्यय भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूच्या बाबतीत आला आहे. सिंधून रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकाची कमाई करत ऐतिहासिक यश संपादित केलं. मात्र, तिकडे सिंधू देशाची मान उंचावत असताना इकडे काही भारतीय तिची जात शोधण्यात गुंतले होते.
रिओ ऑलिम्पिकमध्ये पीव्ही सिंधूने बॅडमिंटन महिला एकेरीच्या फायनलमध्ये धडक मारल्यावर तिच्या नावाने गूगल सर्चची संख्या वाढली. तिच्याबद्दल विविध माहिती अनेकांनी सर्च केल्याचं समोर आलं आहे.
सिंधूचा सामना सुरु असताना गूगलचं इंट्रेस्ट ओव्हर टाईम अचानक वाढलं. मात्र, धक्कादायक म्हणजे, यादरम्यान सिंधूची जात शोधणाऱ्यांची संख्याही मोठी होती. ‘PV Sindhu’ असं गूगल सर्चमध्ये टाईप केल्यावर सजेशनमध्ये चौथ्या क्रमांकावर ‘pv sindhu caste’ असं सजेशन येतं.
गूगलवर सिंधूची जात शोधणाऱ्यांमध्ये आंध्र प्रदेश राज्य पहिल्या स्थानावर आहे, तर तेलंगणा राज्य दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या स्थानावर हरियाणा, चौथ्या स्थानावर कर्नाटक, तर पाचव्या स्थानावर तामिळनाडू आहे.
सिंधूची जात शोधण्यासाठी भारतातील महाशयांनी Pv Sindhu Caste, Pusarala Caste आणि PV Ramana अशा की-वर्ड्सचा वापर केल्याचं समोर आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
निवडणूक
कोल्हापूर
Advertisement