एक्स्प्लोर
Samsung Mobiles Fest: सॅमसंगच्या अनेक स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट
मुंबई: सॅमसंगचे नवनवे मोबाइल तुम्हाला आता लवकरच खास ऑफरसह खरेदी करता येणार आहेत. कारण की, लवकरच फ्लिपकार्ट सॅमसंग मोबाइल फेस्ट आणणार आहे. या फेस्टमध्ये सॅमसंगच्या मोबाइलवर खास ऑफर मिळणार आहेत.
सॅमसंगच्या कोणत्या स्मार्टफोनवर मिळणार?
- सॅमसंग गॅलक्सी On Nxt
- सॅमसंग गॅलक्सी On8
- सॅमसंग गॅलक्सी On7
- सॅमसंग गॅलक्सी On5
- सॅमसंग गॅलक्सी J5 (2016)
- सॅमसंग गॅलक्सी A9 Pro
- सॅमसंग गॅलक्सी C9 Pro
सॅमसंग गॅलक्सी On5 : सर्वात जास्त डिस्काउंट सॅमसंग गॅलक्सी On5 मिळणार आहे. याच्या किंमतीत 2,860 रुपयांची सूट मिळणार आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन 6,990 रुपयात खरेदी करता येणार आहे.
सॅमसंग गॅलक्सी On Nxt: याच्या किंमतीत 2590 रुपयांची सूट दिली आहे. याचा ब्लॅक आणि गोल्ड हे दोन्ही व्हेरिएंट आता 15,900 रुपयात खरेदी करता येणर आहेत. याची किंमत 18,490 रुपये होती. या डिव्हाइसवर एक्सचेंज ऑफरही आहे.
सॅमसंग गॅलक्सी J5 (2016): या स्मार्टफोन 2300 रुपयांची सूट देण्यात आली असून हा स्मार्टफोन 10,990 रुपयात उपलब्ध आहे.
सॅमसंग गॅलक्सी On8, गॅलक्सी On7: सॅमसंग गॅलक्सी On8 वर 2,000 रुपयांची सूट आहे तर गॅलक्सी On7 वर 1700 रुपयांचं डिस्काउंट मिळणार आहे. हे दोन्ही स्मार्टफोन 13,900 आणि 8,490 रुपयात उपलब्ध असेल.
सॅमसंग गॅलक्सी A9 Pro आणि गॅलक्सी C9 Pro : या दोन्ही डिव्हाईसवर कोणतीही सूट नसली तरी हे दोन्ही स्मार्टफोन ईएमआयवर उपल्बध आहे. त्यावर कोणतंही व्याज आकारण्यात येणार नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement