एक्स्प्लोर
सॅमसंगचा गॅलक्सी On8 बजेट स्मार्टफोन लाँच
मुंबई: सॅमसंगनं आपला नवा बजेट स्मार्टफोन गॅलक्सी On8 भारतात लाँच केला आहे. याची किंमत 15,900 रु. आहे. ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटवर हा स्मार्टफोन 2 ऑक्टोबरपासून विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. हा स्मार्टफोन गोल्ड, ब्लॅक आणि व्हाईट या कलरमध्ये उपलब्ध असणार आहे.
गॅलक्सी On8 स्मार्टफोनमध्ये 5.5 इंच फूल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनला संपूर्ण मेटल बॉडी लूक देण्यात आला आहे. तसंच यामध्ये अल्ट्रा डेटा सेव्हिंग मोड हे फीचर देखील देण्यात आलं आहे.
या स्मार्टफोनमध्ये 1.6GHz ऑक्टाकोअर प्रोसेसर आणि सोबतच 3 जीबी रॅम देण्यात आला आहे. तसंच अँड्रॉईड 6.0 मार्शमेलोव ओएसवर आधारित आहे. यामध्ये 16 जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली असून 128 जीबीपर्यंत मेमरी वाढविता येऊ शकते.
या स्मार्टफोनची खासियत म्हणजे याचा कॅमेरा. यामध्ये 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा देण्यात आला असून 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
या स्मार्टफोनमध्ये वाय-फाय, ब्ल्यूटूथ, यूएसबी पोर्ट, ऑडिओ जॅक यासारखे फीचरही देण्यात आले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement