एक्स्प्लोर
Advertisement
सॅमसंग गॅलक्सी नोट 8 लाँच, किंमत, फीचर्स आणि लाँचिंग ऑफर्स
दिल्लीत सॅमसंगने मेगा इव्हेंटमध्ये हा फोन लाँच केला. भारतात या फोनची किंमत 67 हजार 900 रुपये ठेवण्यात आली आहे. अमेझॉन इंडिया आणि सॅमसंगच्या वेबसाईटवर हा फोन बुक करता येईल. बुकिंगनंतर 21 सप्टेंबरपासूनच फोनची डिलीव्हरी सुरु केली जाणार आहे.
नवी दिल्ली : सॅमसंगने नोट सीरिजचा नवा फ्लॅगशिप फॅबलेट गॅलक्सी नोट 8 भारतात लाँच केला आहे. दिल्लीत मेगा इव्हेंटमध्ये कंपनीने हा फोन लाँच केला. अमेझॉन इंडिया आणि सॅमसंगच्या वेबसाईटवर हा फोन बुक करता येईल. बुकिंगनंतर 21 सप्टेंबरपासूनच फोनची डिलीव्हरी सुरु केली जाणार आहे.
भारतात या फोनची किंमत 67 हजार 900 रुपये ठेवण्यात आली आहे. दरम्यान फोन लाँच होण्यापूर्वीच अडीच लाख ग्राहकांनी या फोनसाठी नोंदणी केली होती. दीड लाख ग्राहकांनी अमेझॉनवर, तर एक लाख ग्राहकांनी सॅमसंगच्या वेबसाईटवर फोन बुक केल्याची माहिती समोर आली होती.
लाँचिंग ऑफर्स
गॅलक्सी नोट 8 खरेदी करताना एचडीएफसी क्रेडिट कार्ड असणाऱ्या ग्राहकांना 4 हजार रुपये कॅशबॅक मिळणार आहे. तर कंपनीने सॅमसंग अपग्रेड ऑफरही दिली आहे. ज्यामुळे तुम्ही तुमचा जुना फोन देऊन गॅलक्सी नोट 8 खरेदी करु शकता. तर गॅलक्सी नोट 8 च्या ग्राहकांना 8 महिन्यांसाठी जिओचा 448 GB डेटा मोफत मिळणार आहे. यासोबत प्राईम मेंबरशिपही मिळेल.
स्क्रीन
या फोनमध्ये 6.3 इंच आकाराची Quad HD+ Super AMOLED(2960×1440 पिक्सेल) (521ppi) इन्फिनिटी स्क्रीन देण्यात आली आहे. एज टू एज फीचरही देण्यात आलं आहे. त्यासाठी युझर्सना 'एस पेन' देण्यात येईल. यामध्ये सिंपल नोट्स आणि लाईव्ह मेसेजही पाठवता येईल. हा फोन stylus IP68 वॉटरप्रूफ आहे.
कॅमेरा
गॅलक्सी नोट 8 मध्ये 12 मेगापिक्सेलचा ड्युअल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. ड्युअल रिअर कॅमेरापैकी एक 12 मेगापिक्सेलचा वाईड अँगल कॅमेरा आहे, तर दुसरा 12 मेगापिक्सेलचा टेलीफोटो रिअर कॅमेरा आहे. यामध्ये तुम्हाला फोटो काढताना बॅकग्राऊंड ब्लर करुनही फोटो फोकस करता येईल.
फ्रंट कॅमेरा
ड्युअल रिअर कॅमेरासोबत 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये तुम्ही दोन अॅप एकाच वेळी ऑपरेट करु शकता.
प्रोसेसर आणि रॅम
या फोनमध्ये 6GB रॅमसोबत क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 835 प्रोसेसर देण्यात आलं आहे. ग्राहकांना हा फोन खरेदी करताना 64GB/128GB/256GB असे तीन व्हेरिएंटचे पर्याय मिळतील.
किंमत
अमेरिकेत गॅलक्सी नोट 8 ची किंमत 59 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. तर इंग्लंडमध्ये 71 हजार रुपयात हा फोन उपलब्ध आहे. भारतात या फोनची किंमत 67 हजार 900 रुपये ठेवण्यात आली आहे.
गॅलक्सी नोट 8 चे फीचर्स :
- अँड्रॉईड 7.1.1 नॉगट
- 6.3 इंच आकाराची एचडी स्क्रीन (Quad HD+ Super AMOLED)
- IP68 वॉटरप्रूफ
- 12 मेगापिक्सेल ड्युअल रिअर कॅमेरा (10X पर्यंत झूम फीचर)
- 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
- क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 835 प्रोसेसर
- 6GB रॅम आणि 64 GB, 128 GB आणि 256 GB इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंट
- दोन अॅप एकावेळी चालणार
- व्हर्चुअल असिस्टंट Bixby
- 3300mAh क्षमतेची बॅटरी
- फास्ट वायर्ड चार्जिंग सपोर्ट
- ब्ल्यूटूथ 5.0
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
कोल्हापूर
निवडणूक
निवडणूक
Advertisement