Safer Internet Day 2022 : Safer Internet Day च्या निमित्ताने जाणून घ्या गुगलच्या 'या' सात गोष्टी
Safer Internet Day 2022 : आज सुरक्षित इंटरनेट दिवस आहे. लोकांना डिजिटल जगाची जाणीव करून देण्यासाठी सुरक्षित इंटरनेट दिवस सुरू करण्यात आला.
Safer Internet Day 2022 : आज सुरक्षित इंटरनेट दिवस (Safer Internet Day) आहे. लोकांना डिजिटल जगाची जाणीव करून देण्यासाठी सुरक्षित इंटरनेट दिवस सुरू करण्यात आला. याची सुरुवात 2005 मध्ये झाली. जसजसे इंटरनेट वेगाने वाढत आहे, त्याच वेगाने ऑनलाइन फसवणूकही वाढत आहे. युरोपियन युनियन (EU) सेफबॉर्डर प्रकल्पाचा एक उपक्रम म्हणून सुरक्षित इंटरनेट दिवस 2004 मध्ये पहिल्यांदा सुरू झाला. त्यानंतर 2005 पासून अधिकृतपणे सुरु करण्यात आला. डिजिटल जगात सुरक्षित राहण्यासाठी गुगलने काही उपाय सुचवले आहेत, जे तुम्ही लक्षात घेतल्यास तुमच्याबरोबर फसवणूक होण्याची शक्यता फार कमी होईल. चला जाणून घेऊया.
1. अकाऊंटची सुरक्षा होईल मजबूत :
तुमचा मोबाईल नंबर किंवा ईमेल पत्ता तुमच्या खात्याशी जोडलेला असल्याची खात्री करा. कारण कोणत्याही संशयास्पद क्रियाकलापाच्या बाबतीत तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर अलर्ट मिळेल. अशा परिस्थितीत, Gmail किंवा इतर कोणत्याही खात्यात नक्कीच मोबाईल नंबर जोडा.
2. पासवर्ड मॅनेजरची मदत घ्या :
बहुतेकदा आपल्या सगळ्यांकडेच एकापेक्षा जास्त पासवर्ड असतात. अनेकदा हे पासवर्ड लक्षातही राहत नाहीत. अशा वेळी पासवर्ड पुन्हा रिसेट करावा लागतो. असे झाल्यास, पासवर्ड मॅनेजरची मदत घ्या.
3. सॉफ्टवेअर अपडेट करा :
मोबाईल किंवा लॅपटॉपचे सॉफ्टवेअर अपडेट करण्यासाठी अनेकदा सूचना दिल्या जातात, ज्याकडे आपण सहजपणे दुर्लक्ष करतो. म्हणूनच, त्यांना वेळोवेळी अपडेट करत राहणे गरजेचे आहे. अॅप्स, ब्राउझर आणि इतर सर्व सॉफ्टवेअर्स अद्ययावत ठेवणे महत्त्वाचे आहे. याकडे दुर्लक्ष केल्याने सायबर क्राईमसारखे गुन्हे घडू शकतात.
4. टू फॅक्टर ऑथेंटिकेशन :
टू फॅक्टर ऑथेंटिकेशन डिजिटल जगात खूप महत्वाचे आहे. टू फॅक्टर ऑथेंटिकेशन सक्षम केल्यानंतर, जेव्हा तुम्ही नवीन डिव्हाईसवर लॉग इन कराल तेव्हा तुमच्या मोबाईल नंबरवर एक कोड तयार होईल आणि त्यानंतरच लॉगिन केले जाईल. अशा प्रकारे तुमचे अकाऊंट पूर्णपणे सुरक्षित राहील.
5. सिक्युरिटी चेकअप टूल वापरून तुमच्या सुरक्षिततेची चाचणी घ्या :
गुगलमध्ये सिक्युरिटी चेकअप टूल आहे. तुमचा कोणताही पासवर्ड हॅक झाला आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता. हे तुम्ही sign in केलेले डिव्हाईस, अलीकडील सुरक्षा इव्हेंट, तुमचे रिपीट पासवर्ड आणि बरेच काही दाखवते.
6. लॉग आऊट :
बऱ्याचदा अकाऊंट ओपन केल्यानंतर आपण ते लॉग आऊट करायला विसरतो. यामुळे कोणीही अवैधरित्या तुमची माहिती चोरू शकतात किंवा त्याचा गैरवापर करू शकतात. अशावेळी लॉग आऊट करायला विसरू नका.
7. Online paying Apps :
महत्वाच्या बातम्या :
- Important Days in February 2022 : फेब्रुवारी महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?
- Google Chrome : गुगल क्रोम वापरणाऱ्यांनो सावधान! हॅकर्सपासून वाचण्यासाठी 'या' सोप्या टीप्स फॉलो करा
- Digital Payment Tips : UPI, NEFT आणि IMPS वर व्यवहार अयशस्वी झाल्यास 'या' पद्धतींनी पैसै परत मिळवा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha