एक्स्प्लोर
जिओ म्हणजे व्यावसायिक निर्णय, जुगार नाही : मुकेश अंबानी

मुंबईः रिलायन्स जिओची ऑफर म्हणजे विचारपूर्वक घेतलेला निर्णय आहे, त्याला जुगार समजू नये, अशा शब्दात रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी उत्तर दिलं. रिलायन्सने दिलेल्या या ऑफरमधून कंपनीला कसा फायदा होत असेल, ऑफर संपल्यानंतर काय, असा प्रश्न अनेकांना सतावतो. त्यावर मुकेश अंबानींनी रोखठोक उत्तरं दिली. कार्यक्रम 'ऑफ दी कफ'मध्ये ते बोलत होते. रिलायन्स जिओ म्हणजे विचारपूर्वक तयार करण्यात आलेला निर्णय आहे. यासाठी कंपनीने 2 लाख 50 हजार कोटींची गुतंवणूक केली आहे, असं अंबानी यांनी सांगितलं. काय आहेत रिलायन्स जिओच्या ऑफर्स ? 19 रुपयांत एका दिवसाचं इंटरनेट (किती डेटा मिळणार याचा उल्लेख नाही) 999 रुपयात 10 GB डेटा - रात्री अनलिमिटेड 4G 1499 रुपयात 20 GB डेटा- रात्री अनलिमिटिड 4G 2499 रुपयात 35 GB डेटा- रात्री अनलिमिटिड 4G 3999 रुपयात 60 GB डेटा- रात्री अनलिमिटिड 4G 4999 रुपयात 75 GB डेटा- रात्री अनलिमिटिड 4G
संबंधित बातम्याः
रिलायन्स जिओचा धमाका, लाईफ-टाईम फ्री कॉलिंग, 50 रुपयात 1GB 4G डेटा
रिलायन्स जिओचा धुमाकूळ, कार्ड घेण्यासाठी रात्री 2 वाजल्यापासून रांगा
रिलायन्स जिओ सिम खरेदी करा आणि 3 महिन्यांपर्यंत फ्री इंटरनेट, कॉल, मेसेज मिळवा
Reliance Jio: अवघ्या 93 रुपयात मिळणार 10 जीबी 4G डेटा!
आणखी वाचा























