एक्स्प्लोर
जीएसटीपूर्वी ग्राहकांची दिवाळी, जवळपास सर्वच कंपन्यांकडून भरघोस सूट

मुंबई : देशात 1 जुलैपासून जीएसटी लागू होणार आहे, मात्र त्याचा परिणाम आत्ताच जाणवू लागला आहे. कारण जवळपास सर्वच कंपन्यांनी वस्तूंवर भरघोस सूट दिली आहे. एसी, टीव्ही, फ्रीज आणि मोबाईलसह इतर वस्तूंवरही मोठी सूट दिली जात आहे.
दुचाकी, चारचाकींवरही सूट
मारुतीच्या कारवर अगोदरपासून जी सूट दिली जात होती, ती आणखी दहा हजार रुपयांनी वाढवली आहे. टोयोटाच्या गाड्यांवरही अशीच सूट आहे. टाटाच्या कारवरही ऑफर सुरु आहे.
दुचाकींवरही डिस्काऊंट दिला जात आहे. जीएसटी लागू होण्यापूर्वी बंपर सेल सुरु झाल्याने या ऑफर दिल्या जात आहेत. विविध कंपन्यांच्या गाड्यांवर 15 हजार रुपयांपासून 60 हजार रुपयांपर्यंत डिस्काऊंट दिला जात आहे.
60 हजार रुपयांचा 'आयफोन 7' 40 हजार रुपयांत
प्री-जीएसटी सेलमध्ये 60 हजार रुपयांचा आयफोन 7 40 हजार रुपयांमध्ये मिळतोय. एचपीचा 85 हजार रुपये किंमतीचा लॅपटॉप 65 हजार रुपयांमध्ये उपलब्ध आहे. कॅनॉनचा 5 डी कॅमेरा, ज्याची किंमत जवळपास सव्वा तीन लाख रुपये आहे, तो जीएसटी लागू होण्यापूर्वी 2 लाख 65 हजार रुपयांमध्ये मिळतोय. तर एक लाख रुपये किंमतीचा एलईडी टीव्ही 50 टक्के डिस्काऊंटसह 50 हजार रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
ब्रँडेड कपड्यांवरही 40 ते 60 टक्के सूट!
ब्रँडेड कपड्यांच्या कंपन्यांनीही कपड्यांवर 40 ते 60 टक्क्यांपर्यंत सूट दिली आहे. जाणकारांच्या मते, जीएसटी लागू झाल्यानंतर व्यवसायावर किती आणि कसा परिणाम होईल, याबाबत कंपन्यांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे कंपन्यांना जुना स्टॉक कमीत कमी ठेवायचा आहे. शिवाय व्यवसाय वाढवण्यासाठीही कंपन्यांना यामुळे फायदा होईल.
बजाजने दुचाकींवर 4 हजार 500 रुपयांची सूट दिली आहे. तर ऑडीनेही अगोदरच सूट देत असल्याची घोषणा केली आहे. कार कंपन्या अडीच लाखांपर्यंत सूट देत आहेत. तर रीबॉक, वुडलँडसारख्या कंपन्याही उत्पादनांवर भरघोस सूट देत आहेत.
सर्वच कंपन्या जीएसटी लागू होण्यापूर्वी जुना स्टॉक संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण नवीन करप्रणालीनुसार मार्जिन बदलण्याची शक्यता आहे. कोणतीही कंपनी 1 जुलैपूर्वी स्टॉक संपवू शकत नाही, पण जास्तीत जास्त विक्री करण्याचं उद्दीष्ट आहे, असं वुडलँडचे व्यवस्थापकीय संचालक हरकिरत सिंह यांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्राईम
अहमदनगर
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज






















