एक्स्प्लोर
'पोकिमॉन गो'च्या सीईओचं ट्विटर अकाऊण्ट हॅक
मुंबई : टेक विश्वातील दिग्गजांचं सोशल मीडिया अकाऊण्ट हॅक होण्याचा प्रकार काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. पोकिमॉन गो या सध्या जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या मोबाईल गेमच्या पॅरेंट कंपनीच्या सीईओचं ट्विटर अकाऊण्ट हॅक झालं आहे.
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग यांच्या ट्विटर अकाऊण्टवरही हॅकर्सची वक्रदृष्टी होती. त्यानंतर आता रिअॅलिटी मोबाईल गेम पोकिमॉन गोच्या पॅरेंट कंपनीचे सीईओ जॉन हँक यांचा नंबर लागला आहे.
अनेक सुप्रसिद्ध व्यक्तींची सोशल मीडिया अकाऊण्ट हॅक करणाऱ्या 'अवरमाईन' (OurMine) या ग्रुपनेच हँक यांचं अकाऊण्ट हॅक केल्याचा दावा केला जात आहे.
या अकाऊण्टच्या ट्विटर अकाऊण्टवरुन अनेक ट्वीट्स केली जात आहेत. नेहमीप्रमाणेच अवरमाईनने हॅकिंगची जबाबदारी स्वीकारली आहे. एका ट्वीटमध्ये हँक यांचा पासवर्ड nopass असल्याचं म्हटलं आहे. हा पासवर्ड अत्यंत सोपा असल्याचंही या ट्वीटमध्ये लिहिलं आहे. सुरक्षा तपासण्याच्या उद्देशाने आम्ही हे अकाऊण्ट हॅक केल्याचं तथाकथित अवरमाईन ग्रुपने म्हटलं आहे. सिक्युरिटी अपग्रेड करण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या, असंही हॅकर्सनी म्हटलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement