एक्स्प्लोर
व्हॉट्सअॅपला टक्कर, लवकरच पेटीएमची मेसेजिंग सेवा
गेल्या तीन महिन्यांपासून कंपनी या फीचरवर काम करत असल्याची माहिती आहे. व्हॉट्सअॅप डिजीटल पेमेंटच्या क्षेत्रात प्रवेश करण्याच्या तयारीत असताना पेटीएमने हे पाऊल उचललं आहे.
मुंबई : सोशल नेटवर्किंगमध्ये सध्या व्हॉट्सअॅप निर्विवाद वर्चस्व गाजवत आहे. मात्र चीनच्या अलिबाबा समुहाची पेटीएम कंपनी लवकरच व्हॉट्सअॅपला टक्कर देण्याच्या तयारीत आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत पेटीएमची मेसेजिंग सेवा सुरु होण्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
पेटीएम यूझर्सना चॅट करण्याची सुविधा एका नवीन फीचरच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. सोबतच म्युझिक, फोटो, व्हिडिओ शेअर करण्याचीही सोय असेल. पेटीएमच्या प्रवक्त्यांनी मात्र यावर काहीही बोलण्यास नकार दिला आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून कंपनी या फीचरवर काम करत असल्याची माहिती आहे. व्हॉट्सअॅप डिजीटल पेमेंटच्या क्षेत्रात प्रवेश करण्याच्या तयारीत असताना पेटीएमने हे पाऊल उचललं आहे. नोटाबंदीनंतर ईपेमेंटमध्ये वाढ झाली होती. पेटीएमसारख्या कंपन्यांचा मार्केट शेअर तेजीने वाढला.
भारतात व्हॉट्सअॅपचे कोट्यवधी यूझर्स आहेत. त्यामुळे पेटीएमला जम बसवण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागेल. फेब्रुवारीत 20 कोटींपेक्षा जास्त अॅक्टिव्ह व्हॉट्सअॅप यूझर्स होते. महिन्याला किमान एकदा ऑनलाईन दर्शन देणाऱ्या यूझर्सचा यात समावेश होतो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement