एक्स्प्लोर
OPPO रेनो 2 झेड आणि रेनो 2 एफच्या किंमतीत कपात, नवीन ऑफर्सची घोषणा
ओप्पो रेनो 2 झेड आणि ओप्पो रेनो 2 एफ या दोन फोनच्या किंमतीत घट करण्याबरोबरच ओप्पोने रेनो 2 सीरिजवर अनेक ऑफर्सची घोषणाही केली आहे.
मुंबई : गॅझेटप्रेमींसाठी खुशखबर आहे. ओप्पो या स्मार्टफोन ब्रॅण्डने आपल्या ओप्पो रेनो 2 झेड आणि ओप्पो रेनो 2 एफ या स्मार्टफोनच्या किंमतीत दोन हजार रुपयांची कपात केली आहे. रेनो 2 झेड आणि रेनो 2 एफ या फोन आता अनुक्रमे 27,990 आणि 23, 990 रुपयांना मिळणार आहे. याआधी रेनो 2 झेडची किंमत 29000 आणि रेनो 2 एफची किंमत 25990 रुपये होती. हे फोन ऑफलाईन आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत.
या दोन नवीन फोनच्या किंमतीत घट करण्याबरोबरच ओप्पोने रेनो 2 सीरिजवर अनेक ऑफर्सची घोषणाही केली आहे.
- ग्राहक आता रेनो 2 मालिकेतील स्मार्टफोन शून्य डाऊनपेमेंटवर बजाज फिनसर्ववरुन खरेदी करु शकतात. तसंच आयडीएफसी फर्स्ट बँक, होम क्रेडिट किंवा एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेसकडून ईएमआयचे पर्यायही मिळवू शकतात.
- एचडीबी ग्राहक कर्जांवर 10 टक्के कॅशबॅक ऑफर देत असून एचडीएफसीच्या ग्राहकांना डेबिट-क्रेडिट कार्डवर केलेल्या खरेदीवर 5 टक्के कॅशबॅक मिळेल.
- ओप्पो जिओच्या ग्राहकांना 198 आणि 299 रुपयांच्या प्लॅनवर 100 टक्के अतिरिक्त डेटाही देत आहे. त्याचबरोबर एअरटेल ग्राहकांना 249 रुपये रिचार्जवर डबल डेटा आणि अमर्यादित कॉलिंग तसंच इन्स्टाकॅशवर एक्स्चेंज मूल्यावर अतिरिक्त 10 टक्के देत आहे.
- 9 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर 2019 या कालावधीत ओप्पो सर्व्हिस सेंटर्सवर एक महिन्यासाठी विशेष ऑफरही लागू आहे. त्यात ग्राहकांना मोफत स्क्रीनगार्ड आणि बॅककव्हर रेनो 2 झेड आणि ओप्पो रेनो 2 एफ या फोनच्या खरेदीवर मिळेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement