एक्स्प्लोर
One Plus 5T स्मार्टफोनचं लाँचिंग अवघ्या काही तासात
वन प्लस 5T हा स्मार्टफोन आज (गुरुवार) लाँच होणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 9.30 हा फोन लाँच करण्यात येणार आहे.
मुंबई : वन प्लस 5T हा स्मार्टफोन आज (गुरुवार) लाँच होणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 9.30 हा फोन लाँच करण्यात येणार आहे. न्यूयॉर्कच्या ब्रूकलिनमध्ये या फोनचा लाँचिंग सोहळा पार पडणार आहे. वन प्लस 5 फोनचं हे अपडेटेड व्हर्जन आहे. या फोनसाठी भारतात 21 नोव्हेंबरपासून फ्लॅश सेल असणार आहे. अमेझॉन इंडिया आणि वन प्लस स्टोअर इंडियाच्या वेबसाइटवर हा स्मार्टफोन उपलब्ध असणार आहे.
भारतात या फोनची किंमत 35 ते 40 हजार रुपये असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, लाँचिंगआधीच या स्मार्टफोनचा एक व्हिडीओ लिक झाला होता.
वन प्लस 5T मध्ये कोणते फीचर असतील याचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामध्ये 6 इंच एचडी स्क्रीन आणि 2.45 गीगाहर्त्झ क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 835 प्रोसेसर असणार आहे. तसेच 6 जीबी आणि 8जीबी रॅमसह 64 जीबी आणि 128 जीबी इंटरनल मेमरी व्हेरिएंट असणार आहेत. या स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सल आणि 20 मेगापिक्सल असे दोन कॅमेरे दिले जाऊ शकतात. तर 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा असण्याची शक्यता आहे.
तसंच या स्मार्टफोनमध्ये 3450 mAh बॅटरी असू शकते. हा स्मार्टफोन अँड्रॉईड 8.0 ओरिओ यावर ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित असणार आहे.
हे सर्व फीचर लीक व्हिडीओ आणि फोटोनुसार देण्यात आले आहेत. लाँचिंगनंतरच या स्मार्टफोनचे नेमके फीचर काय आहेत हे जगासमोर येणार आहे. त्यामुळे ग्राहकांना या फोनसाठी अवघे काही तास वाट पाहावी लागणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement