एक्स्प्लोर
Advertisement
नोकिया 3310 फोनच्या फर्स्ट लूकचा व्हिडिओ उजेडात
नवी दिल्ली: एकेकाळी सर्वात लोकप्रिय ठरलेल्या नोकिया 3310 हा फोन बाजारात पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या वृत्तनुसार, HMD ग्लोबल नोकिया कंपनी आपल्या या लोकप्रिय 3310 फोनला पुन्हा लॉन्च करणार आहे. हे नवे फोन पूर्वीपेक्षा उत्तम दर्जाचे नवे फिचर फोन असतील, असं सांगण्यात येत आहे. याच्या नव्या डिझाईनचा व्हिडिओ नुकताच रिलीज झाला असून, यात 3310 चा नवा फोन अतिशय आकर्षक ढंगात दाखवण्यात आला आहे.
युट्यूब चॅनेलवरील Conceptor च्या या व्हिडिओनुसार, या नव्या फोनमध्ये 1.5 इंचाची स्क्रिन असून, ती 265K सपोर्टिव्ह असेल. तसेच यामध्ये यूएसबी पोर्ट आणि 8 जीबीपर्यंत इंटरनल मेमरीही असणार आहे. याशिवाय यात 1650 mAh बॅटरी असेल.
यापूर्वी VentureBeat यांनीही आपल्या एका रिपोर्टमध्ये HMD ग्लोबल MWC मध्ये 3 किंवा 5 स्मार्टफोन लॉन्च करेल, असं सांगितलं होतं. तसेच यामध्ये दोन नोकियाचे 3310 फिचर फोनला नव्या अॅन्ड्रॉइडसोबत आणणार असल्याचं सांगितलं होतं.
व्हिडिओ पाहा
संबंधित बातम्या: नोकिया 3310 लवकरच बाजारात येणार!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement