(Source: Poll of Polls)
दमदार फिचर्ससह आज भारतात लॉन्च होणार Motorolaचा बजेट फोन Moto G 5G
मोटोरोलाचा हा फोन भारतातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन्सपैकी एक असणार आहे. या फोनची किंमत 25000 च्या आसपास असण्याची शक्यता आहे. आज दुपारी 12 वाजता हा फोनो लॉन्च करणार येणार आहे.
Motorola चा Moto G 5G आज भारतात लॉन्च होणार आहे. कंपनी आज दुपारी 12 वाजता हा फोनो लॉन्च करणार आहे. हा फोन युरोपमध्ये काही दिवसांपूर्वीच लॉन्च करण्यात आला आहे. मोटोरोलाचा हा फोन भारतातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन्सपैकी एक असणार आहे. या फोनची किंमत 25000 च्या आसपास असण्याची शक्यता आहे. यामध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. जाणून घेऊया फोनच्या स्पेसिफिकेशन्सबाबत...
संभाव्य स्पेसिफिकेशन्स
Motorola Moto G 5G मध्ये 6.7 इंचाचा फुल एचडी+ (1080x2400 पिक्सल) LTPS डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 750G प्रोसेसर देण्यात आला आहे. यामध्ये 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज देण्यात आलं आहे. ज्यामध्ये मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने एक टीबीपर्यंत वाढवता येऊ शकतं. मोटोरोलाचा हा फोन अॅन्ड्रॉइड 10 वर काम करतो. फोनला पॉवर देण्यासाठी 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. जी 20 व्हॅट टर्बोपॉवर फास्ट चार्जिंग सपोर्ट करत आहे. कनेक्टिव्हिटी फिचर्सबाबत बोलायचं झालं तर यामध्ये 5G, NFC, ब्लूटूथ 5.1, वाय-फाय 802.11 एसी, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि जीपीएस देण्यात आलं आहे. सिक्युरिटीसाठी फोनच्या रियरर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आलं आहे.
कॅमेरा
कॅमेऱ्याबाबत बोलायचं झालं तर Motorola Moto G 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्याचा प्रायमरी सेंसर 48 मेगापिक्सल आहे. फोनमध्ये 8 मेगापिक्सल वाइड-अँगल आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो सेंसरही देण्यात आलं आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यामध्ये 16 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आलं आहे.
अशी असू शकते किंमत
युरोपमध्ये या फोनच्या 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज असणाऱ्या व्हेरियंटची किंमत 299.99 यूरो म्हणजेच, 26,300 रुपये होती. असं मानलं जात आहे की, भारतात या फोनला याच किंमतीत लॉन्च केलं जाऊ शकतं. या फोनमध्ये तुम्हाला वॉल्कॅनिक ग्रे, प्रॉस्टेड सिल्वर कलर ऑप्शन मिळतो.
महत्त्वाच्या बातम्या :