एक्स्प्लोर
तब्बल 6GB रॅम, मोटोचा नवा हायटेक फीचर्स फोन लाँच
मोटो Z या फोनचं हे अपडेटेड व्हर्जन आहे. ड्युअल रिअर कॅमेरा आणि 6 GB रॅम ही या फोनची सर्वात मोठी वैशिष्ट्य आहेत.

नवी दिल्ली : मोटोरोलाचा नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन मोटो Z2 फोर्स लाँच झाला आहे. मोटो Z या फोनचं हे अपडेटेड व्हर्जन आहे. ड्युअल रिअर कॅमेरा आणि 6 GB रॅम ही या फोनची सर्वात मोठी वैशिष्ट्य आहेत. या फोनमध्ये शॅटरशिल्ड स्क्रीन वापरण्यात आलेली आहे. ज्यामुळे स्क्रीन तुटणार नाही, असा दावा कंपनीने केला आहे. हा फोन 10 ऑगस्टपासून अमेरिकेत विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. अमेरिकेत या फोनची किंमत 799 डॉलर म्हणजे जवळपास 51 हजार 500 रुपये ठेवण्यात आली आहे. गोल्ड, ग्रे आणि ब्लॅक या तीन कलरमध्ये हा फोन विक्रीसाठी उपलब्ध असेल. भारतात हा फोन कधीपर्यंत लाँच केला जाईल, याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. फीचर्स :
- नॉगट 7.1 ओएस
- 5.5 इंच आकाराची स्क्रीन
- स्नॅपड्रॅगन 835 चिपसेट
- 4 आणि 6 GB रॅम दोन व्हेरिएंट
- 12 मेगापिक्सेल ड्युअल रिअर कॅमेरा
- 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
- 2730mAh क्षमतेची बॅटरी
आणखी वाचा























